आम्ही आमदार राहुल जगताप यांच्यासोबत - नागवडे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. राज़्य सरकारने ज़ाहीर केलेली कर्जमाफीची योजना ही किचकट आहे. विद्यार्थी, शेतकरी यांना कोणतीही मदत सरकारकारकडून होत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतानाही देशात पेट्रोल -डिझेल व ग्यासचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे हेच का ते अच्छे दिन अशी ओरड आता ज़नता करू लागली आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

काँग्रेस पक्षामध्ये सध्या तरुणांना संधी दिली जात असून, काँग्रेस पक्षाच्या ज़िल्हाध्यक्षपदी नगर दक्षिणेतील व्यक्तीला संधी मिळावी, अशी अपेक्षा शि. ना. सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केली. श्रीगोंदा काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी प्रशांत दरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर नागवडे यांनी आयोज़ित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

आ. राहुल जगताप यांच्या कामावर श्रीगोंदा काँग्रेस समाधानी आहे का ? या प्रश्नावर नागवडे यांनी आ. जगताप हे विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे काही कामे पूर्ण होण्यात अडचणी येत आहेत; परंतु आम्ही पक्ष म्हणून जगताप यांच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. 

कालच्या निवडीवेळी काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी म्हणून अनुराधा नागवडे यांची तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब गिरमकर,अणासाहेब शेलार, राजेंद्र नागवडे, सिद्धेशवर देशमुख यांची निवड करण्यात आली.

पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांचीदेखील या वेळी निवड करण्यात आल्याचे नागवडे यांनी सांगितले. या वेळी बोलताना नागवडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला असून, काळापैसा बाहेर आला नाहीच,उलट सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. जीएसटीचा निर्णय काँग्रेस सरकारचाच होता, पण १४ टक्के पर्यंतच जीएसटी लागू करण्याचे काँग्रेसचे धोरण होते; परंतु भाजप सरकारने तोच जीएसटी २८ टक्क्यार्यंत नेऊन ठेवला. त्यामुळे विकासदर घटून महागाई वाढली आहे. 

या वेळी नूतन काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर म्हणाले, तालुक्यात गाव तिथं शाखा स्थापन करून पक्षाच्या माध्यमातून सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले. या वेळी संचालक सुनील माने,सुभाष शिंदे, अरुण रोडे, सुनील जंगले, माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे, प्रसाद काटे आदी उपस्थित होते. .

दरम्यान, पत्रकार परिषदेत राजेंद्र नागवडे यांना आपण जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहात का ? याबाबत विचारले असता, ते म्हणाले, जिल्हाध्यक्ष निवडण्याचा अधिकार हा पक्षश्रेष्ठींचा आहे. ना. राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात हे त्याबाबत निर्णय घेतील, पण दक्षिणेतून काँग्रेस पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांनी मोठे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे दक्षिणेतून काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष निवडला जावा,यासाठी आपण प्रयत्नशील असून, तो बहुमान दक्षिणेतील कार्यकत्र्याला मिळावा, असे मत नागवडे यांनी व्यक्त करून आपणसुद्धा या पदासाठी इच्छुक असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.