श्रीगोंदा पोलिस ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांमध्ये झटापट.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा पोलीस ठाणे आणि महिला कर्मचाऱ्यांचा वाद हे नेहमीचेच समीकरण बनले असताना मंगळवारी (दि.२६) पुन्हा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दोन महिला कर्मचाऱ्यात जोरदार झटापट झाली. यावेळी येणारे-जाणारे नागरिक त्यांच्याकडे पाहत होते. मात्र याकडे त्यांचे अजिबात लक्ष नव्हते. अंतर्गत वादामुळे नागरिकात एक वेगळाच संदेश नागरीकांमध्ये गेला.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांमध्ये होणारे वाद ही नेहमीचीच बाब होवून बसली आहे. मागील काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात किरकोळ कारणाहून सर्वसामान्य जनतेसमोर दोन महिला कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार मारामारी झाली होती. त्या घटनेच्या आठवणी ताज्या असतानाच पुन्हा तशीच घटना घडली. या महिला कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.

हा प्रकार सुरु असताना येणारे-जाणारे सर्वसामान्य नागरिक त्यांच्याकडे पाहत होते याचे त्यांना भानही राहिले नव्हते. शिस्तप्रिय खात्यात असे प्रकार कधीपासून चालतात याबाबत उलट - सुलट चर्चा ऐकण्यास मिळत होती. मात्र या चर्चेचे त्या महिला कर्मचाऱ्र्यांना काहीच घेणे - देणे नव्हते, असेच चित्र त्या ठिकाणी पाहण्यास मिळाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.