दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून वृद्धाची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील पिंपरणे परिसरातील वनविभागाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या झाडाला दोरीच्या साहाय्याने वृद्धाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. २६) सकाळी १०.४० वाजेच्या पूर्वी घडली आहे. किसन देवराम मरभळ (वय-६२) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किसन मरभळ हे पिंपरणे याठिकाणी राहत आहे. मंगळवारी सकाळी वनविभागाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेवून त्यांनी आत्महत्या केली आहे. त्या ठिकाणाहून जाणाऱ्या आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यामुळे त्यांनीही घटनेची माहिती गावातील ग्रामस्थांना सांगितली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मरभळ यांचा मृतदेह घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. 

याप्रकरणी वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र कुलकर्णी हे करत आहेत. मरभळ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.