मलाही दसरा मेळाव्याचे विनाकारण टेन्शन - पंकजा मुंडे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भगवान गड हा माझ्यासह संपूर्ण समाजाच्या श्रद्धेचा विषय आहे. गेल्या वर्षी दसरा मेळाव्यात याच गडावरून मी आता तुमची माता आहे, असे कार्यकर्त्यांसमोर जाहीर केले होते. मी वयाने लहान आहे मात्र समाजाचे नेतृत्व आणि मातृत्वाची जबाबदारी माझ्याकडे आहे.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

बीड आणि औरंगाबाद येथे कार्यकर्त्यांशीही दसरा मेळाव्यासंदर्भात मी सविस्तर चर्चा केली. तेव्हा कार्यकर्त्यांनी तुम्ही मेळावा घ्या, असा आग्रह केला आहे. आता मलाही दसरा मेळाव्याचे विनाकारण टेन्शन येत असल्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, भगवान गडावर दसऱ्याच्या दिवशी मेळावा घ्या, कुठे भाषण करायचे, कसे करायचे याचा निर्णय तुम्हीच घ्या आणि आम्हाला सांगा असे कार्यकर्त्यांमधून, समाजामधून बोलले जात आहे. एकीकडे सगळा समाज आहे आणि दुसरीकडे एकटे महंत नामदेव शास्त्री आहेत.

ते भगवान बाबांच्या गादीवर विराजमान असल्याने त्यांच्याविषयी काहीही बोलणे मला शोभणारे नाही. समाजाचे मनही मला मोडता येणार नाही. श्रद्धेमुळे गड आहे आणि गडामुळे आपण हे गणित कुठल्याही कारणावरून बिघडू द्यायचे नाही, त्यासाठी मी प्रयत्न करत आहे, प्रयत्न करत राहणार आहे.

माझ्यावर समाजाची आता मोठी जबाबदारी आहे. समाजाचे प्रेम माझ्यावर खूप आहे. त्यामुळे मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यात कोणालाही काही झाले तरी त्याचा त्रास मला होणार आहे. त्यामुळे जसजसा दसरा जवळ येत आहे, तसे मलाही विनाकारण टेन्शन येत आहे. कार्यकर्ते, संपूर्ण समाजामधून मेळावा घ्या, असा आग्रह आहे. त्यामुळे आता काय करावे असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.