शिर्डी विमानतळाची पहिली चाचणी यशस्वी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी विमानतळाची पहिली चाचणी यशस्वी झाली. या चाचणी विमान प्रवासाचा पहिला प्रवासी होण्याचा मान जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना मिळाला.साईभक्तांच्या सुविधेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या शिर्डी विमानतळाचे साईबाबा शताब्दी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकार्पण होत असल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. साई शताब्दी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी विविध ठिकाणच्या भक्तांना सहभागी होण्याची संधी यामुळे प्राप्त झाली आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

चाचणी घेणारे अलायन्स एअरवेजचे ७२ सिटचे विमान मुंबईच्या सांताक्रुझ विमानतळावरून दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी-शिर्डीच्या दिशेने झेपावले. अवघ्या चाळीस मिनिटात पाच वाजून दोन मिनिटांनी या विमानाची चाके नव्याने उभारलेल्या शिर्डी विमानतळाच्या भूमीवर विसावली.

संचालक सुरेश काकणी, हवाई वाहतूक विभागाचे अधिकारी व सुरक्षा अधिकारी यांचा समावेश होता. यावेळी विमानतळावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार स्नेहलता कोल्हे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, साईसंस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्यकार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष ममता पिपाडा, माजी विश्वस्त सचिन तांबे, जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, शिर्डी विमानतळाचे संचालक धिरेन भोसले आदींसह शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री राम शिंदे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. येत्या एक ऑक्टोबर रोजी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

साईबाबा समाधी महोत्सवाचं औचित्य साधून भाविकांना विमान सेवा उपलब्ध करून देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. प्रारंभी मुंबई, दिल्ली, हैदराबाद, भोपाळ येथून शिर्डीसाठी रोज सहा उड्डाणांची मंजुरी असली तरी सुरुवातीला या ठिकाणांवरून एक-एक उड्डाण सुरू केलं जाईल. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून उड्डाणांची संख्या वाढवली जाणार आहे. दरम्यान, यानंतर विमानतळावर राष्ट्रपती यांच्या दौऱ्याची आढावा बैठक घेण्यात आली.

डिसेंबरपासून डे-नाईट विमानसेवा.
शिर्डी विमानतळासाठी राज्य सरकारने ३२० कोटी रूपये खर्च करून विमानतळाची निर्मिती केली आहे. यासाठी नऊ वर्षांचा कालावधी लागला आहे. सध्या या विमानतळातून दिवसा विमानसेवा सुरू राहणार आहे. डिसेंबरपासून डे- नाईट सेवा सुरू राहणार आहे.- प्रा.राम शिंदे, पालकमंत्री, अहमदनगर.


अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मान्यता.
शिर्डी विमानतळाला अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मान्यता देण्यात येवून प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात आली होती. साईसंस्थानच्या या अगोदरच्या व्यवस्थापन मंडळाने ५० कोटी रूपये शिर्डी विमानतळासाठी दिले होते. - राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.