जनतेच्या पैशाचे वाटोळे कोणी केले ? - नगराध्यक्ष विजय वहाडणे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :१ कोटीचा जलतरण तलाव, ८० लाखांचा कत्तलखाना, पालखी रस्ता ही कामे कुणी वाटली ? जनतेच्या पैशाचे वाटोळे कोणी केले ? असे सवाल करून मी आहे,तो पर्यंत एका रूपयाचाही भ्रष्टाचार मी खपवून घेणार नाही अशा शब्दात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी विरोधकांना प्रभाग क्रमांक ६ मधील रस्ता काँक्रीटीकरणाच्या शुभारंभी सुनावले.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, माझ्या रक्तामध्ये भाजप आहे. पण, मी भाजपमध्ये नाही. मी जर बोलायला लागलो तर तुम्हाला शहरात फिरता येणार नाही. शहर विकासात राजकारण केल्यास तुम्हाला राजकारणात आडवे केल्याशिवाय राहणार नाही.

हा रस्ता स्व.सुर्यभान वहाडणे यांना पडत्या काळात साथ देणाऱ्या त्यांचे मित्र स्व.दत्तोपंत गुरव यांना समर्पित करीत आहे. पालिका सभेत बहीष्कार टाकणारे मला येवून भेटले. कुणाच्या सांगण्यावरून चालले ? शहर विकासात राजकारण करणारांविरूध्द मीही राजकारण करील. 

निवडणूक संपली, राजकारण संपले असे मी जाहीर करून ३१ नगरसेवकांना सन्मानपूर्वक वागणूक दिली. पालिकेत २५-३० टक्केवारीच्या भ्रष्टाचारामुळे ठेकेदार कामे घेत नव्हते. स्वातंत्र्यापासून शहराच्या प्राथमिक गरजा पूर्ण होत नाहीत हि शरमेची बाब आहे,असेही वहाडणे म्हणाले.

यावेळी आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक शेवटपयंर्त वहाडणे यांच्यासोबत राहतील, अशी ग्वाही दिली. झावरे यांनी वहाडणेंना पाठींबा देण्याची दानत 'त्यांच्यात' नाही. भाजपची निष्ठा कुठे आहे ? हे सर्वांना माहित आहे,अशी टिका करत वहाडणेंमध्ये काम करण्याची धमक असल्याने आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. पालिकेत कुणी खोडा घातला तर आम्ही भक्कम आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.