भगवानबाबा गड परिसरातील ग्रामस्थांचा मेळाव्याला विरोध

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भगवानगडावर व पायथ्याला राजकीय मेळाव्याला परवानगी देऊ नये यासाठी परिसारातील दहा गावातील सुमारे पाच हजार सह्यांचे पाथर्डी तहसीलदारांना सोमवारी दिले. यानंतर या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन देखील या सह्यांचे निवेदन दिले. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातून मेळाव्याला विरोध करणारी सहा निवेदने जिल्हाधिकारी यांना देण्यात आली. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

भगवानबाबा गडाच्या असणाऱ्या खरवंडी, मालेवाडी, ढाकणवाडी, तुळजवाडी, जवळवाडी, काटेवाडी, कीर्तनवाडी, मिडसांगवी, मुंगुसवाडे, भारजवाडी येथील सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांची भेट घेतली. दसरा मेळाव्याला गड व पायथ्याला परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. 

'भगवानबाबा की जय', 'एकच बंदी, भाषण बंदी', अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या दहा गावातील सुमारे पाच हजार ग्रामस्थांच्या निवेदनावर सह्या आहेत.

यानंतर रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा सरचिटणीस रविंद्र आरोळे, इंद्रजीत शिंदे, विलास गजभीव, संजय शिरसाट, पोपट दौंडे, पप्पू नरवडे, नवनाथ आरोळे, नवनाथ तिजोरे, विश्वास धनवे व भारतीय जनता पक्षाचे तालुकाअध्यक्ष माणिक खेडकर यांनी तहसीलदार पाटील यांची भेट घेतली. 

गडावरील मेळावा बहुजणांची अस्मिता आहे. गोपीनाथ मुंडे यांनी बहुजणांची मोट याच गडावरुन बांधली आहे. तिच परंपरा पंकजा मुंडे चालवित आहेत. मेळावा झालाच पाहिजे. त्यासाठी परवानगी द्यावी, असे आशयाचे निवेदन कार्यकर्त्यांनी दिले.

दरम्यान, मेळाव्याला परवानगी देऊ अशी अशायाची औरंगाबाद जिल्ह्यातून देखील सहा निवेदने जिल्हाधिकारी यांना आज सोमवारी देण्यात आली आहेत. बाळापूर, भगतसिंगनगर, हडको-सिडको, परिजातनगर, वाळुंज, एमआयडीसी, भगवानभक्त औरंगाबाद यांची ही निवेदने आहे. 

दसरा शनिवारी (ता. ३०) होत आहे. मेळावा व्हावा आणि होऊ नये अशा दोन्ही बाजूने निवेदने देण्यात येत आहे. प्रशासनावर राजकीय दबाव वाढत चालला आहे. प्रशासकीय पातळीवर याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे आता लक्ष लागले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.