शेतजमिनीसाठी नातवाकडून विळयाचे वार करून वृध्देचा खून.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नावावरील शेतजमीन वाटप करून देत नसल्याच्या कारणावरून खानापूर येथील एका ७० वर्षीय वृध्देचा नातवाने विळयाच्या सहाय्याने खून केल्याची घटना घडली आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याप्रकरणी पोलिसांनी चोवीस तासांत तपास लावून आरोपी प्रभाकर धोंडीराम जगधने (वय-१९) याला अटक केली आहे. शांताबाई आसाराम जगधने असे मयत महिलेचे नाव आहे. मयत शांताबाई यांचा मुलगा माणिक आसाराम जगधने (वय-४९) रा. खानापूर यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, मयत शांताबाई हिच्या नावावर एक हेक्टर, १० गुंठे शेतजमीन होती. त्यांना दोन मुले व तीन मुली आहेत. प्रभाकर हा त्यांच्याकडे सतत जमीन वाटप करण्याची मागणी करीत होता. शनिवार, दि.२३ रोजी त्या जिजामाता विद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या शांताबाई लांडे यांच्या शेतात जनावरांना गवत आणण्यासाठी गेल्या होत्या. 

या वेळी आरोपी प्रभाकर धोंडीराम जगधने रा. खानापूर याने विळयाचे वार करून तिला जबर जखमी करून तिचा खून केल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी आरोपी प्रभाकर यास ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ईकबाल शेख पुढील तपास करीत आहेत. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.