बाजार समित्यांनी शेतमाल साठवणुकीसाठी गोडावून उभारावे : ना. राधाकृष्ण विखे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गोडावून अभावी शेतकऱ्यांना आहे त्या भावात माल विकून तोटा सोसावा लागतो, हे नुकसान टाळण्यासाठी व शेतकरीहित जोपासण्याकरीता राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतमाल साठवणुकीसाठी गोडावून उभारणी करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

राहाता शहरातील साई विठ्ठला लॉन्समध्ये झालेल्या राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ना. विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, उपसभापती वाल्मिकराव गोर्डे, गणेश सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके, माजी सभापती भाऊसाहेब कडू, अशोकराव जमधडे, लेखापरीक्षक गव्हाणकर, शिवाजी वाघ, बाबासाहेब डांगे, ॲड. रघुनाथ बोठे, नंदु राठी, शांतीनाथ आहेर, राजेंद्र लहारे आदी उपस्थित होते.

ना. विखे पाटील म्हणाले, शेतीमालाची साठवणूक करण्यासाठी पाच हजार मेट्रिक टनावर क्षमतेचे गोडावून बांधून कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. शेतीमालाचे भाव घसरले कमी झाले की शेतकऱ्यांना माल गोडावूनमध्ये ठेवता येईल.

भाव कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांकडे उत्पादित माल साठवणूकीची व्यवस्था अथवा यंत्रणा नसते. तसेच घरी स्वत:चे गोडावून बांधण्याची आर्थिक क्षमता शेतकऱ्यांची नसते. परिणामी कमी भावात तो आपला माल विकून टाकतो, यात मोठा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी गोडावून उभारणी करणे महत्वाचे आहे.

समितीच्या निवडणुकीसंदर्भातील शासनाच्या नवीन धोरणात काही सुधारणा करणे गरजेचे आहे. किमान सलग तीन वर्षे शेतकऱ्याने शेतमाल पुरविला का? याची नियमावली करून विचार केला पाहिजे. निवडणुका घेण्यासाठी काही बाजार समितींकडे पैसेच नाही. त्यांना निवडणुकीसाठी तर काही बाजार समितीपुढे कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचे? असा प्रश्न असल्याने त्यांना पगारासाठी पैसे देण्याची वेळ सरकारवर येवू शकते, अशी परिस्थिती आहे. 

अनेक ठिकाणी बाजार समित्यांमध्ये संचालक मंडळाचे व्यापाऱ्यांवर नियंत्रण असण्याऐवजी व्यापाऱ्यांचे संचालक मंडळावर नियंत्रण आहे, अशी परिस्थिती आहे. अशा समित्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास गमावला आहे. याला राहाता बाजार समिती अपवाद असून शेतकऱ्यांना अधिक भाव कसा मिळेल शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेत शेतकऱ्यांचे हित जोपासून त्यांचा विश्वास संपादन केल्याने समितीने अल्पावधीत राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. 

संचालक मंडळ, सचिव उद्धवराव देवकर तसेच व्यापारी प्रामाणिकपणे योगदान देत असल्याने बाजार समितीची भरभराट होते असल्याचेही यावेळी विखे पाटील यांनी सांगितले. अहवाल वाचन सचिव उद्धव देवकर यांनी तर प्रास्ताविक सभापती बापूसाहेब आहेर यांनी केले. आभार संचालक सुनिल गमे यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.