पालकमंत्री प्रा. शिंदे करणार पहिला मुंबई-शिर्डी विमान प्रवास.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महाराष्‍ट्र राज्‍याचे जलसंधारण व राजशिष्‍टाचार, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याणमंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे आज मंगळवार दि. 26 सप्‍टेंबर 2017 रोजी दुपारी 3 वाजता सांताक्रूझ विमानतळ मुंबई येथून अलायन्स एअरवेजच्‍या प्रायोगिक तत्‍वावरील विमानाने शिर्डी येथे येणार आहेत. विमान प्राधिकरणाने या विमानतळास परवाना दिल्यानंतर होणार्‍या पहिल्या मुंबई-शिर्डी हा प्रायोगिक तत्वावरील विमान प्रवास प्रा. शिंदे हे करणार आहेत.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

दुपारी 3.35 वाजता त्यांचे शिर्डी विमानतळ येथे आगमन. त्यानंतर विमानतळाची पाहणी आणि विमान प्राधिकरणाच्‍या अधिकार्‍यांसमवेत बैठक होणार आहे. दुपारी 4.30 वाजता दिनांक 1 ऑक्‍टोबर 2017 रोजीच्‍या श्री साईबाबा समाधी सोहळयाच्‍या श्री साईबाबा समाधी मंदिर कॉम्‍प्‍लेक्‍स, झेंडावंदन स्‍थळ- श्री साईबाबा मंदिर, येथे अधिकार्‍यांसमवेत भेटी देऊन या दौर्‍याच्या अनुषंगाने सर्व संबंधित अधिका-यांच्‍या समवेत नियोजित आढावा बैठकीस उपस्थित राहणार आहेत. ( स्‍थळ - श्री साईबाबा विश्‍वस्‍त सभागृह, शिर्डी )

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.