शौचालयाच्या खड्ड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा शहराच्या मारूतीनगर या भागात शौचालयासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून अडीच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली.सध्या शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगरपंचायतीचे कर्मचारी झटत आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

दररोज सायंकाळी आणि पहाटेच्या दरम्यान भरारी पथके उघड्यावर बसलेल्या शौचास नागरिकांना समज देऊन कार्यवाही करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. शहर हागणदारीमुक्तसाठी प्रभागात शौचालयाची बांधकामे सुरू आहे. मारूतीनगर प्रभाग १७ मध्ये शौचालयाची कामे चालू आहे.

या ठिकाणी पावसामुळे अंतर्गत रस्ते खराब झाल्याने काही नागरिकांना शौचालयाच्या कामासाठी लागणाऱ्या वस्तू आणण्यातही अडथळा येतो. सोमवारी २५ सप्टेंबर रोजी शिवनाथ जाधव यांच्या शेजारी शौचालयाचा खड्डा खोदण्यात आला होता आणि पावसामुळे यात पाणी साचलेले होते. 

या खड्ड्यात वैशाली शिवनाथ जाधव ही अडीच वर्षांची मुलगी पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रभाग नगराध्यक्ष संगिता बर्डे यांचा आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.