जिल्हा न्यायालयात गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांना आता दंड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्हा न्यायालयाच्या अद्ययावत नूतन भव्य वास्तूमध्ये गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांना गंभीर स्वरुपाचा दंड करण्याचा निर्णय शहर वकील संघटनेच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. शहर वकील संघटनेच्या नूतन कार्यकारिणी निवडीनंतर पहिलीच बैठक जेष्ठ वकील जॉन कुसमुडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

या बैठकीत अनेक महत्वपूर्ण प्रश्नांवर चर्चा करुन ते प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात आला. नुकतेच ॲड. सुदाम देवकर यांच्या परिवाराला आर्थिक सहकार्य करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. ॲड. नरेश गुगळे यांनी कै. देवकर यांच्या एका मुलाच्या पूर्ण शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी घेतल्याचे यावेळी जाहीर केले.

त्याचप्रमाणे अतिभव्य अद्ययावत उभारण्यात आलेल्या जिल्हा न्यालयाच्या नवीन वास्तूमध्ये काही वकील व पक्षकार मावा खाऊन सर्वत्र थुंकून इमारतीचे विद्रुपीकरण करत आहे. तरी गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांना गंभीर दंड वसूल करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. 

नूतन इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असून ती सोडविण्यासाठी प्रधान जिल्हा न्यायाधीश पी. आर. माळी यांनी पुढाकार घेऊन मनपाकडे पाठपुरावा केल्याने मनपातर्फे लवकरच नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली असून काम सुरु करणार असल्याने न्या. माळी यांचे अभिनंदन करण्यात आले.

वकील संघटनेचे नूतन अध्यक्ष सुरेश ठोकळ म्हणाले की, नवीन वकील संघटनेची कार्यकारिणी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असून वकिलांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा सुरु केला आहे. न्यायालयाच्या सर्व बार रुममध्ये नगरच्या प्रसिद्ध दिवंगत वकिलांचे फोटो लावून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शहर संघटनेचे प्रशांत मोरे, चंदर बारटक्के, कृष्णा झावरे, अनुराधा आठरे, नानासाहेब पादीर, बी. एस. खांडरे, कारभारी गवळी, एम. एन. मोरे, तुळशीराम बाबर, शहाजी दिवटे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.