श्रीरामपुरात महिलेच्या गळ्यातून गंठण तोडून दोघे पसार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर शहरातील उत्सव मंगल कार्यालय परिसरात एका महिलेच्या गळ्यातून गंठण तोडून दोघे मोटारसायकलवरून पसार झाले.शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास हा प्रकार घडला. ज्योती शैलेंद्र डावखर यांनी शहर पोलिसांत याबाबतची फिर्याद दाखल केली. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

नवरात्रोत्सवानिमित्त उत्सव मंगल कार्यालयात शुक्रवारी दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या परिसरात महिलांची गर्दी होती. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांपैकी एकाने गर्दीचा फायदा घेत ज्योती डावखर यांच्या गळ्यातील गंठण तोडून पळ काढला. 

महिलेने आरडाओरडा केला. परंतु, आजूबाजूचे लोक सावध होईपर्यंत चोरटे पसार झाले होते. फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.