सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी म्हणजे लबाडाच्या घरचे आवतण.

 अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी म्हणजे लबाडाच्या घरचे आवतण, जेवल्याशिवाय काही खरे नसते अशी आहे. त्यामुळे कर्जमाफीचे जेवन कधी मिळेल त्याची वाट पाहावी लागेल. अशी भाजप सरकारवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

अहमदनगर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही टीका केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करूनही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना न मिळालेली मदत या मुद्द्यांवरून पवार यांनी यावेळी सरकारला चांगलेच धारेवर धरले.

ते पुढे म्हणाले की, पूर्ण कर्जमाफी देण्याचे जाहीर करून मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण शब्द काढून टाकला व सहा वेगवेगळे आदेश काढून अटी टाकल्या. त्यामुळे कर्जमाफी किचकट अटींची झाली असल्याचे शरद पवार म्हणाले. 

भाजपच्या तीन वर्षात महागाई वाढली, रोजगार कमी झाला, शेती उत्पन्न घटले, औद्योगिक उत्पन्न घटले. याकडे दुर्लक्ष करून बुलेट ट्रेन सारख्या प्रकल्पातील आर्थिक गुंतवणूक करणे हे खुपच चिंताजनक असल्याचेही ते म्हणाले. यापेक्षा पाटबंधारे प्रकल्पाना निधी देऊन गती दिली असती तर राज्याचा फायदा झाला असल्याचे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजप सरकारला राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा असल्याच्या आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या विधानाचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. याविषयी बोलताना ते म्हणाले, रामदास आठवले हे विनोदी गृहस्थ आहेत. संसदेत ते बोलण्यासाठी उभे राहिले की सर्वजण हसतात. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिलं.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.