​​​पतसंस्था बळकटीकरणासाठी शासनाचे सर्वातोपरी सहकार्य.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राज्यातील सहकार चळवळीला गती देण्यासोबतच पतसंस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्यशासन सर्वातोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिर्डी येथे व्यक्त केले­.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

सहकार प्रशिक्षण व संशोधन मंदिर व बुलढाणा अर्बन भक्त निवासाच्या उद्धाटनप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर, नगराध्यक्षा योगिता शेळके,श्री साईबाबा संस्थान विश्वस्थ व्यवस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम श्री. काका कोयटे यांना सहकार तपस्वी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच राज्यातील विविध सहकारी पतसंथेला राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

सहकार राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले, सहकार चळवळीत पतसंस्थेचे अनन्यसाधारण महत्व असून, सामान्य नागरिकांचा खरा विकास आणि गरजा पूर्ण करण्याचे महत्वाचे साधन म्हणून पतसंस्थेकडे पाहिले जाते. आज सामान्य माणसाला सक्षम बनविण्याचे काम पतसंस्था करत असून, त्यासाठी शासन तुमच्या सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करील. या सहकार चळवळीत अडचणीतील पतसंस्थांच्या बळकटीकरणासाठी शासन प्रयत्नशील आहे. सहकार चळवळीला अनन्यसाधारण महत्व आहे.

सहकार चळवळीतील शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी सहकारी पतसंस्थांनी काम करावे तसेच संघटन, प्रशासनातील गतिमानता, आधुनिकता वाढविण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचे सर्वांगिण विकासाचे उद्दिष्ट ठेवून विकास साधता येईल असे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सहकार चळवळ ही तर माझ्या संपूर्ण आयुष्याचा केंद्रबिंदुच बनला आहे. राज्यातील सहकारी को- ऑप बँकाप्रमाणे पतसंस्थांच्या बळकटीकरणाची गरज आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी संघटन आणि सहकार चळवळीवरील विश्वास महत्वाचा आहे.

आमदार रणधीर सावरकर म्हणाले, सहकार चळवळीच्या विकासाच्या प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग असणे अत्यंत महत्वाचे आहे तसेच प्रशासनातील पारदर्शकता व प्रत्येक व्यक्तींची मेहनतही सहकार चळवळीत यशासाठी महत्वाची ठरणार आहे.

चंद्रशेखर कदम म्हणाले, सहकार चळवळीत आणि दैनंदिन जीवनात सातत्य, पारदर्शकता, प्रशासनातील गतिमानता या बाबीला महत्व आहे.

यावेळी प्रास्ताविक श्री. काका कोयटे यांनी केले. यावेळी सहकार पतसंस्था चळवळीतील विविध पदाधिकारी, कर्मचारी, पुरस्कार्थी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.