अहमदनगरमध्ये शिक्षक बँकेच्या सभेतच मास्तरांचा राडा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आज नगरमध्ये प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेतच चांगलाच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. शिक्षकांनी जोरदार शिवीगाळ करत एकमेकांना धक्काबुक्की केली. सभेतील हाणामारीचा हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

सत्ताधारी आणि विरोधकांनी घोषणाबाजी करत निषेधाचे फलक फडकावले. यावेळी संचालक मंडळाने सभासदांचा बाप का काढला, त्यांनी अगोदर माफी मागावी तरच सभा सुरु होईल, असे म्हणत जोरदार वादंग सुरु केला.माफी मागितल्याशिवाय सभा सुरु होऊ न देण्याचे सांगत आधी पाच प्रश्न झाले पाहिजेत, अशी भूमिका विरोधकांनी घेतली.हुकूमशाही चालणार नाही, गोंधळ सुरुच राहणार असं सांगून विरोधकांनी व्यासपीठाचा ताबा मिळवला. 

त्यानंतर मास्तरांनी एकमेकांना व्यासपीठावरच धक्काबुक्की केली. इतकंच नाही, तर खाली पाडून तुडवले, एकमेकांवर लोड भिरकावत गोंधळही घातला. मास्तरांना आवरण्यासाठी पोलिसांना व्यासपीठावर बोलवण्यात आले. तेव्हा पोलिसांनी मास्तरांना ढकलत सभागृहाबाहेर हाकलले. गोंधळी मास्तरांची गचांडी धरुन पोलिसांनी त्यांना चोप दिला.

पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी व्यासपीठाचा ताबा घेत शिक्षकपदाची लाज राखण्याचे आवाहन केले.गोंधळ घालणाऱ्या १८ शिक्षक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेे. यात तीन महिलांचा देखील समावेश आहे. कोतवाली पोलिसांनी सायंकाळी उशिरापर्यंत प्रतिबंधात्मक कारवाई करून या नेत्यांना रात्री उशिरापर्यंत सोडून दिले 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.