मेळाव्यास विरोध करणाऱ्या महंतांनी हिमालयात जावे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यापर्यंत वर्षानुवर्षे चालत आलेला भगवनागडावरील बहुजनांचा दसरा मेळावा लोकभावनेचा आदर राखून होऊ द्यावा, यासाठी गडाचे महंत डॉ. नामदेव शास्री यांनी प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा आडमुठेपणाची भूमिका घेणाऱ्या महंतांनी आपल्या पदाचा त्याग करून गड सोडून हिमालयात जावे, असा सल्ला भारतीय टायगर फोर्सचे प्रदेशाध्यक्ष प्रा. किसनराव चव्हाण यांनी दिला. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

भगवानगड व देशातील बहुजन समाजाचे अतुट नाते आहे. संत भगवानबाबा हे देशातील सर्व जाती धर्मांतील बहुजनांचे दैवत असून, वंजारी समाजाने त्यांना संकुचित अथवा जातीपुरते मर्यादित ठेवू नये, अशी भूमिका प्रा. चव्हाण यांनी मांडली. 

प्रा. चव्हाण म्हणाले, आध्यात्मिक क्षेत्रातील संत -महंत हे अहंकार, द्वेष, असुया, मत्सर या षडरिपू विरहित असतात. महंत यांची दसरा मेळाव्यास विरोध करण्याची भूमिका आडमुठेपणाची आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री लोकनेते यशवंतराव चव्हाणांपासून लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यापर्यंत भगवानगडावर बहुजनांचे मेळावे वर्षानुवर्षे पार पडले आहेत.

या मेळाव्यांतून बहुजनांना जगण्याची ताकद मिळाली. संतांचे विचार मिळाले. त्याला राजकीय स्वरूप कधीही आले नाही. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशीही संत भगवानबाबा यांची अनेक विषयांवर चर्चा होत असे. बहुजन समाजाचा आध्यात्मिक क्षेत्रातून उद्धार करण्याचे कार्य संत भगवानबाबांनी केले. सध्याचे महंत डॉ. शास्री मात्र संत भगवानबाबांच्या विचारांना हरताळ फासत आहेत. 

महंत दसरा मेळाव्यास का विरोध करीत आहेत, हा प्रश्नच आहे. त्यांना कोणत्या राजकीय शक्तीची मदत होत आहे,चर्चेचा विषय झाला असून, महंतांनी अशा शक्तींना बळी पडावे, हे दुर्दैवी आहे. बहुजनांच्या दसरा मेळाव्यास विरोध करणे सोडून महंतांनी लोकभावनेचा आदर राखून भगवानगडावर दसरा मेळावा होऊ द्यावा, अशी मागणी प्रा. चव्हाण यांनी केली. 

भारतीय टायगर फोर्स संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब आव्हाड म्हणाले, संत भगवानबाबा हे शिवशंकर व संत ज्ञानेश्वरांचा अवतार होते, ही लोकभावना बहुजनांत आहे. अशा थोर संतांच्या गडावर बहुजनांच्या दसरा मेळाव्याबाबत सुरू असलेला वाद दुर्दैवी आहे. 

गोपीनाथ मुंडे यांची संत भगवानबाबांवर अपार श्रद्धा व निष्ठा होती. त्यांनी भगवानगडाचे नाव देशात व परदेशात पोचविले. त्यांच्या कन्या ना. पंकजा मुंडे यांना डॉ. शास्री यांनी गडाची कन्या मानली. असे असताना महंत बहुजनांच्या दसरा मेळाव्यास विरोध का करतात, हा खरा प्रश्न आहे. या वेळी भोरू भोसले, माजी जि. प. सदस्य प्रकाश भोसले, दिगंबर गाडे, पप्पूशेठ बोरुडे, वंसत बर्डे, भगवान गायकवाड, राजेंद्र काळे आदींस संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.