नामदेवशास्त्रीना गोपीनाथ मुंडेनंतर वंजारी समाजाचे नेता व्हायचे होते !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वंजारी समाजाचे नेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवान गडाचे प्रमुख नामदेवशास्त्री यांना समाजाचे नेतृत्व करायचे होते .त्यांना स्व . गोपीनाथ मुंडे साहेबाचे वारस होण्याची इच्छा होती या अभिलाषेपाई त्यांनी भगवान गडावर स्व .मुंडे यांच्या कन्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांना दसरा मेळावा घेण्यास आडकाठी घालत आहेत असे प्रतिपादन वंजारवाडी येथील ग्रा.प सदस्य राजेंद्र दराडे यांनी केले. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

शनिवार दि.२३ सप्टेंबर रोजी घोडेगाव ता.नेवासा येथे जय भगवान महासंघाच्या नेवासा शाखेच्या वतीने भगवान गडावर पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी मेळावा आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.दगडू पाटील बडे होते.वंजारी समाजाच्या जय भगवान महासंघाच्या नेवासा शाखेच्या वतीने ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भगवान गडावर दसरा मेळावा घेण्याबाबत पाठिंबा दर्शवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

पंकजाताई यांना गडावर मेळावा घेण्यास सरकारने तोंडबंद केले
यावेळी माजी आ.दगडू पाटील बडे यांनी बोलताना म्हणाले कि स्व.गोपीनाथ मुंडे यांनी यांनी अनेक पुढाऱ्यांना मदत केली पण आज त्यांच्या कन्या पंकजाताई यांना गडावर मेळावा घेण्यास सरकारने तोंडबंद केले आहे.पालकमंत्री नाम.राम शिंदे यांच्यावर देखील टीका करताना ते म्हणाले कि स्व.मुंडे साहेबांनी यांना राजकारणात आणून आमदार केले आज पालकमंत्री नात्याने त्यांनी सरकारला आपली बाजू सांगून मेळावा घेण्यास परवानगी देण्यात यावी. 

 पोलिसांनी गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली 
क्रांतिकारी पक्षाचे संस्थापक सतीश पालवे म्हणाले कि आम्ही नुसते निवेदन पाठवले तरी आम्हाला पोलिसांनी गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आहे.भगवानगड ऊसतोडणी कामगार व बहुजन समाजातील अठरा पगड जातीचे श्रद्धास्थान असून स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते महंत भगवान बाबा यांनी गडाची स्थापना केली होती बाळासाहेब भारदे सारखे विचारवंत या गडाचे विश्वस्थ होते.आज या गडावर नामदेव शास्त्री सोडून दुसऱ्या विश्वस्थांचे नाव देखील आपल्याला माहित नाही.

त्यांना रामरहीम बाबा तर बनायचे नाही ना ?
सामाजिक कार्यकर्ते सुभाष राख म्हणाले,लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गडावर नामदेवशास्त्री यांना स्व.मुंडे साहेबानी गडावर बसवले ते असताना नामदेवशास्त्री यांनी पंकजाताई याना गडाच्या मानसकन्या मानले होते आता ते एवढा विरोध का करत आहेय हे समजत नाही.गडाची हजारो कोटीची प्रॉपर्टी हडप करून गडावर कोणालाही येऊ द्याचे नाही म्हणजे त्यांना रामरहीम बाबा तर बनायचे नाही ना अशी शंका आम्हाला येत आहे. 

सोनई ग्रामपंचायत सदस्य व जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ .रामनाथ बडे यांनी अतिशय आवेशात भाषण करताना वैचारिक पद्धतीने आपणाला हा प्रश्न सोडवायचा असून गडाची परंपरा व इतिहासाला धक्का न लावता संहितेच्या मार्गाने प्रयत्न करायला महासंघाच्या वतीने आपण प्रत्नशील आहोत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.