जामखेड येथील खून प्रकरणात सख्खा मेहूणाच निघाला आरोपी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दोन महिन्यांपूर्वी जामखेड तालुक्यातील मूंजेवाडी येथे हात, पाय, डोके व धड वेगळे करुन विहिरीत टाकलेला विचित्र मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. जामखेड पोलिसांनी दोन महिन्यांपासून तपास सुरू केला होता. या घटनेत खून झालेल्या राहूल दादासाहेब रिटे, (वय ३०) याचा सख्खा मेहूणा दादासाहेब अंकुश रोडे,(रा.मतेवाडी ता.जामखेड) हाच मुख्य आरोपी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून त्याला अटक करण्यात आली आहे.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

तालुक्यातील मुंजेवाडी शिवारातील आशोक बारस्कर यांच्या शेतातील विहिरीत दि.२८ जुलै रोजी तरंगणारे पोते आढळून आले होते. तसेच या पोत्यातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर या घटनेची माहिती जामखेड पोलिसांना दिली.पोत्याचे गाठोडे बाहेर काढले असता पोत्यात एका २५ ते ३० वर्षे वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह अढळुन आला. मात्र त्याचा निर्दयीपणे हत्या करून ओळख मिटवण्यासाठी मृतदेहाच्या शरीराचे हात,पाय,व डोके क्रूरपणे धडापासून तोडून वेगळे केले होते.

त्यावेळी पोलिसांना तपास करणे हे खूप कठीण होते. परंतु पोहेकाँ विठ्ठल चव्हाण यांनी व पोकाँ गहिनीनाथ यादव यांनी आरोपीचा शोध लावला यांची हे कॉ विठ्ठलराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. 

दरम्यान मयताचे वडील दादासाहेब नामदेव रिठे रा. रिठेवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर यांनी जामखेड पोलीस स्टेशनला त्यांचा मुलगा राहुल दादासाहेब रिटे, (वय ३०) हा दि.२५ जुलै पासून हरवला असल्याचा अर्ज दाखल केला होता. पोलिसांनी तपास केला असता सदर मिसिंग दाखल करणाराचे व मृतदेहाच्या शरीरावर सापडलेले करदोडा, अडरपँट ही यांची मिळती जूळती असल्याचे आढळून आले. 

पोलिसांनी सखोल तपासासाठी मिसिंगाच्या आई वडील यांना डि एन ए समजावून सांगून डीएनएसाठी नमूना घेऊन तपासाचा अहवाल जामखेड पोलिसांनी मिळविला असता. अज्ञात मयत व्यक्ती राहूल दादासाहेब रिठे रा रिठेवाडी ता करमाळा हिच व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले.

गुन्ह्याचा तपास करीत असताना राहूल रिठे यांचा मेहूणा दादासाहेब अंकुश रोडे वय २३ रा.मतेवाडी ता.जामखेड यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता. त्याने आपला गुन्हा कबूल केला. तसेच मयताच्या शरीराचे अवयव एका विहिरीत व ओळख पटु नये म्हणून शीर दहा की मी अंतरावरील दुसऱ्या विहिरीत टाकुन दिले. अशी देखील माहिती समोर येत असून या घटनेत अनोखी काही आरोपी आसण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

आरोपी दादासाहेब अंकुश रोडे याने पैशाच्या देवानघेवाणीवरून खून केला असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. तरी पोलिस याबाबत अजून सखोल तपास करत आहेत. या विचित्र गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केला.

यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पो.उपनिरीक्षक नामदेव सहारे, रावसाहेब पोकळे, पो हे काँ विठ्ठलराव चव्हाण, पो.ना.बाबासाहेब बडे, पो.काँ गहिनीनाथ यादव, पो काँ शामसुंदर जाधव,गणेश साने यांनी केला असून. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.