ॲट्रॉसिटीच्या खोट्या खटल्यातील समाजकल्याणची रक्कम परत करण्याचे आदेश.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ॲस्ट्रॉसिटीच्या खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांना न्यायालयाने मोठी चपराक दिली आहे. राज्य शासनाच्या समाजकल्याण खात्याकडून घेतलेले ६० हजार रूपये व्याजासह एक महिन्यात न्यायालयात जमा करण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायधीश एस. यु. बघिले यांनी दिला. राज्यातील हा पहिलाच निकाल असल्याचे बोलले जाते.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

टाकळीभान येथील अनिता नाथा तिडके यांनी गोरक्षनाथ नारायण बनकर (रा. टाकळीभान) यांना हातउसने ४० हजार रूपये दिले होते. हे पैसे मागितले असता आपणास जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली, अशी तक्रार २१ जानेवारी २०१६ रोजी अनिता तिडके यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार पोलिसांनी गोरक्षनाथ बनकर यांच्याविरूद्ध भादंवि कलम ४५२, ३५४, ३२३, ५०४, ५०६ तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. बघिले यांच्यासमोर सुरू झाली. फिर्यादी व आरोपी यांचे जाबजबाब नोंदविताना फिर्यादी अनिता हिने किरकोळ बाचाबाची झाल्याचे सांगितले. इतर घटना घडली नसल्याचेही न्यायालयासमोर सांगितल्याने सरकारी पक्षाने तिला फितूर घोषित केले. 

अनिता हिने समाजकल्याण खात्याकडून ६० हजार रूपयांची मदत मिळाली असल्याचेही न्यायालयात कबूल केले. यावर न्यायाधीश बघिले यांनी फिर्यादी तिडके हीस समाजकल्याण खात्याकडून आलेले ६० हजार रूपये हे सहा टक्के व्याजदराने न्यायालयात एक महिन्याच्या आत भरण्याबाबत आदेश केला. सदर आदेशाची प्रत राज्याचे समाजकल्याण विभागाचे सचिव यांना पाठवून ॲट्रॉसिटीसारख्या कायद्याचा दुरूपयोग रोखण्याबाबत उपाययोजना कराव्यात, असेही आदेशात म्हटले आहे.

 न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी अनिता हिला रक्कम भरण्याबाबतची नोटीस बजावली आहे. अनिता ही टाकळीभानमधील न्यूज सुपरवनची प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ती आहे. सरकारच्या वतीने सरकारी वकील प्रसन्ना गटणे, तर आरोपीच्या वतीने ॲड. एस. एस. चौधरी यांनी काम पाहिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.