पाथर्डीतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील पलायन केलेल्या आरोपीस अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील पलायन केलेल्या आरोपीस बीड पोलिसांनी आष्टी पोलिस ठाणा हद्दीत मोठया शिताफीने शुक्रवारी (दि.२२) दुपारी ताब्यात घेतले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, भैय्या उर्फ मोईन गुलाब शेख (रा. कौडगाव आठरे, ता. पाथर्डी) याच्यावर पाथर्डी पोलिस ठाण्यात लैंगिक अत्यचाराचा गुन्हा दाखल असून तो पाथर्डी पोलिसांच्या कोठडीत होता. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

बुधवारी शेख व दिनेश कारभारी पालवे (रा. कोल्हार, ता. पाथर्डी) या दोघांना नगरच्या सत्र न्यायालयात बुधवारी (दि.२०) आणले होते. न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर या दोन्ही आरोपींना घेऊन पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोना. सचिन नवगिरे, पोकॉ. दिपक शेंडे व ज्ञानेश्वर रसाळ हे पाथर्डीला पुणे-पाथर्डी एसटी बसने निघाले. सायंकाळी ६ वाजता त्यांची बस माळीवाडा बसस्थानकातून निघाली. 

यावेळी सर्वत्र जोरदार पाऊस सुरू होता. मेहेकरी फाटा येथील परिसरात बस आली असता नदीला पूर आल्यामुळे पाथर्डी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. एसटी सायंकाळी साडेसहा वाजता मेहेकरी फाट्याच्याअलीकडे हॉटेलजवळ थांबली. तब्बल दोन तास एसटी तेथेच थांबलेली होती. 

रात्री सव्वा आठच्या सुमारास आरोपी भैय्या शेख याने लघुशंकेचा बहाणा केला. पोलिस नाईक रसाळ व नवगिरे हे एसटीच्या खाली उतरून त्याला जवळच लघुशंकेला घेऊन गेले. यावेळी कॉन्स्टेबल रसाळ यांच्या हातात शेख याची बेडी होती. कॉन्स्टेबल शेंडे हे आरोपी पालवे याच्याबरोबर एसटीमध्येच थांबले होते. 

लघुशंका करताना आरोपी शेख याने कॉन्स्टेबल रसाळ यांच्या हाताला झटका मारून अंधाराचा फायदा घेत पलायन केले होते. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी (दि.२२) दुपारी बीड पोलिसांच्या पथकातील पोना. नवगिरे, पोकॉ. रसाळ, पोकॉ शेंडे यांनी ही कारवाई केली व शेख यास ताब्यात घेतले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.