साखर कारखाने कशा प्रकारे अडचणीत येतील, यासाठी भाजप सरकारचे प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सरकारच्या धोरणांमुळे सध्याचे साखर कारखाने खूप अडचणीत आले आहेत. अशा वेळी साखर कारखान्यांना मदत करण्याऐवजी उलट साखरेचे भाव कमी न केल्यास बाहेरुन साखर आयात करण्याचा दम सरकारने कारखान्यांना दिला आहे. भविष्यात साखर कारखाने कशा प्रकारे अडचणीत येतील, यासाठी हे भाजप सरकार प्रयत्न करत असल्याची टीका राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना अधीमंडळाची सुवर्ण महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी संपन्न झाली. त्याप्रसंगी आ. थोरात बोलत होते.

यावेळी आ.डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, शेतकरी मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, दूधसंघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, रामदास वाघ, शेतकी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव थोरात, अजय फटांगरे, लक्ष्मणराव कुटे, लहानुभाऊ गुंजाळ, नवनाथ अरगडे, बाबा ओहोळ, मधुकर नवले, मिलिंद कानवडे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

आ.थोरात म्हणाले की, हे बनवाबनवीचे सरकार असून त्यांच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. सगळ्याच क्षेत्रात अडचणी निर्माण झाल्या आहेत. नुसत्या घोषणा करण्यामध्येच हे सरकार हुशार आहे; मात्र प्रत्यक्षात शून्य काम आहे.

जीएसटीचे भूत सगळ्यांच्याच मानगुटीवर बसले आहे. हा कर म्हणजे थोडक्यात वसुलीचा धंदा आहे. त्यामुळे भविष्यात सहकारी संस्था टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहे. या सहकारी संस्थांवरच आपले कुटुंब उभे आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी तालुक्याच्या विकासाचा भक्कम पाया घातला. सहकार उभा केला तो जपला. आज राज्यात सर्वांत चांगला सहकार संगमनेरचा ठरला आहे. सर्व संस्था गौरवास्पद कामगिरी करत आहे. काखान्याची ५० वर्षांची सुवर्ण महोत्सवी वाटचाल दमदार राहिली आहे.

या सर्वसाधारण सभेचे नोटीसवाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार उपाध्यक्ष भाऊसाहेब यांनी मानले. यावेळी कारखान्याचे सभासद, शेतकरी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
------------------------------
Powered by Blogger.