भगवान गडावर फक्त कीर्तनकाराचाच आवाज घुमेल - महंत नामदेव शास्त्री.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्री क्षेत्र भगवान गडावर फक्त कीर्तनकाराचाच आवाज घुमेल. या भूमिकेचा भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पुनरूउच्चार केला. भगवान गडावर गडाच्या भूमिकेच्या विरोधात काही व्यक्ती उपोषण करणार असल्याचे भाविकांना माहीत झाल्याने भाविकांनी गडावर गर्दी केली होती. तसेच ठिकठिकाणचे भाविक व ग्रामस्थ एकत्र येत भगवान गडाच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया व घोषणा देत होते. ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

यावेळी महंत त्या ठिकाणी उपस्थित.नव्हते. मात्र जमलेल्या गर्दीची माहिती मिळाल्यानतंर महंतांनी संतप्त भाविकांकडे जात त्यांना शांत केले. व गडावर विरोधक असो की समर्थक सर्वांनाच गडावर भाषणबंदी असल्याचा पुनरुच्यार केला. 

दसरा मेळाव्याचा विषय अधिक संवेदनशील बनला असून, गडाच्या विरोधात उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या समर्थकांना जाब विचारण्यासाठी परिसरातील व बीड जिल्ह्यातील सुमारे पाच हजार समर्थक जमले. गडाविरोधातील आंदोलन स्थगित झाल्याने समर्थकांनी महंताच्या भाषणबंदी निर्णयाचे समर्थन करत. गडाच्या संरक्षणासाठी प्राणपणाने लढाई लढण्याचा संकल्प केला. 

एकच बंदी भाषण बंदी, भगवानबाबा की जय अशा घोषणांनी परिसर दणाणुन गेला. भगवान गडाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्यापुढे होणाऱ्या भाषण बंदीचा निर्णय गडाचे महंत डॉ.नामदेवशास्त्री यांनी जाहीर केल्यापासून भगवानगड राज्यात विविध मुद्यावरून चर्चेत आला आहे. 

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे राजकीय बलस्थान मानला जाणारा मेळावा गडाच्या पायथ्याला घेण्यास मुंडे समर्थकांची तयारी नाही. तर गडावर कुणाचेच भाषण होवू देणार नाही, प्रसंगी संघर्ष करू अशी भूमिका गडाच्या समर्थकांची आहे. 

गडाच्या विरोधात आंदोलन होणार असल्याचे समजल्याने हजारो समर्थकांनी जाब विचारण्यासाठी गर्दी केली. राणेगाव, शिंगोरी, गोळेगाव, पारगाव, लाड जळगाव, माळेगाव, मिडसांगवी, मुंगुसवाडे, भारजवाडी, काटेवाडी, ढाकणवाडी, मालेवाडी, कीर्तनवाडी,खरवंडी, एकनाथ वाडी, श्रीपतवाडी, बडेवाडी, नांदूर टेंभूर्णी , नागलवाडी, फुलसांगवी, सावरगाव, तरडगव्हाण, तिंतरवणी, वडाचीवाडी, जवळवाडी, याशिवाय शिरूर कासार , पाटोदा व गेवराई तालुक्यातील मिळुन सुमारे पाच हजार भाविकांनी गडावर धाव घेत घोषणाबाजी सुरू केली. 

महंत नामदेव शास्त्री यांचे दर्शन घेत आम्ही आजपासूनच सज्ज आहोत. गडाचे काहीही कार्य सांगा अशी प्रार्थना केली. यावेळी संवाद साधताना महंत म्हणाले गडावर कीर्तनकारांशिवाय कोणाचाही आवाज येणार नाही. गडाचे समर्थक असो वा विरोधक गडाच्या निर्णयानूसार राजकीय व्यक्तीचा जसा गडावर आवाज निघणार नाही, तसा गडाच्या समर्थकांचा सुध्दा भाषणबाजीतून आवाज निघणार नाही. समर्थक ,विरोधक अशा सर्वांना भाषण बंदीचा त्यांनी जोरदार पुनरुच्चार केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.