शनिशिंगणापूरमध्ये बॉम्बच्या अफवेने खळबळ, तपासनीनंतर निघाला सोलर लॅम्प.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शनिशिंगणापूर गावात बॉम्ब अशी अफवा पसरली आणि भाविकांत एकच घबराट पसरली. तर्कवितर्क, उलटसुलट चर्चा सुरु झाली. या पार्श्वभूमीवर शिंगणापूर पोलिसांनी देवस्थान परिसरातील सर्वच भाविक आणि विक्रेत्यांना मुख्य प्रवेशद्वाराबाहेर काढले. काहीवेळात शिर्डीहून बॉम्बशोधक पथक आले. या पथकाने संपूर्ण तपासणी केल्यानंतर बॉम्ब नसून सोलर लॅम्प असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

चोरी होत नसलेल्या मुलखावेगळ्या शिंगणापूर गावात आज {दि.२२} सायंकाळी बॉम्ब सापडल्याची अफवा पसरली. येथील अतिथिगृहजवळील सभागृहात ठेवण्यात आलेल्या रथाच्या खाली बॉम्ब असल्याची अफवा कोणीतरी पसरवली. त्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. प्रत्येकजण जीव वाचविण्यासाठी पळू लागला. स्थानिक पोलिसांना हे समजताच पोलिसांनी सर्व भाविक आणि विक्रेत्यांना थेट मुख्य प्रवेशदवाराच्याबाहेर काढले. यामुळे सोनई रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती. 

सर्वांनाच मंदिर प्रवेश नाकारण्यात आला. दरम्यान, यासंदर्भात पोलिसांनी नगरच्या नियंत्रण कक्षाला संपर्क साधून बॉम्बशोधक पथक पाठविण्याची विनंती केली. नेमके याचवेळी नगरचे पथक बाहेर गेल्याने शिर्डीच्या बॉम्बशोधक पथकाने संपूर्ण तपासणी केली असता बॉम्ब नसून सोलर लॅम्प असल्याचे उघड झाले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.