विद्याधाम प्रशालेचा कबड्डी संघ विभागीय स्तरावर,जिल्हा कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यांतील देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेतील १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

श्री गणेश इंटरनॅशनल स्कूल कोऱ्हाळे, शिर्डी येथे जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत श्रीगोंदे तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना विद्याधाम प्रशाला देवदैठण येथील मुलीच्या कबड्डी संघाने अंतिम फेरी गाठताना पाथर्डी, शेवगाव, अकोले संघाचा पराभव केला व अंतीम फेरीत नगर तालुका संघाचा आठ गुणांनी पराभव करुन विजयश्री खेचून आणली.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

 त्यामुळे या संघाची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे . याच प्रशालेतील १७ वर्षे वयोगटातील मुलांनी देखील या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. पण दुसर्‍या फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला. मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवत असताना मयुरी वाघमारे, साक्षी ढवळे, हर्षदा ढवळे, पूनम गुंजाळ यांच्या सुरेख पकडी व चढाया करुन प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकला. तर ऋतुजा कोकाटे, योगिता जाधव, कोमल गायकवाड, कावेरी ठोंबरे, श्वेता गोरे,ऋतुजा मोहोळकर , कोकाटे भाग्यश्री यांनी मोलाची साथ दिली. 

विद्याधाम प्रशालेतील मुलीनी ही सुवर्ण कामगिरी केली. त्यामुळे आतापर्यंत वैयक्तिक खेळात राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या शाळेने सांघिक खेळात जिल्हा पातळीवर सुवर्ण यश मिळविले. विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेत हा संघ नगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे अशी माहिती मुख्याध्यापक संभाजी शेळके यांनी दिली .

या खेळाडुना क्रीडाशिक्षक संदीप घावटे, अमोल कातोरे, सतीश झांबरे ,प्रशांत वाळुंज , सतीश कौठाळे ,सुनंदा शेळके यांचे मार्गदर्शन लाभले.

राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे , मुख्याध्यापक संभाजी शेळके , संस्थेचे अध्यक्ष सुकुमारभाऊ बोरा, शाळेचे चेअरमन राजेंद्र भटेवरा ,सचिव तु. म. परदेशी यांनी खेळाडू व शिक्षक यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

खेळाडूना गणवेश-
विद्याधाम प्रशाला देव दैठण येथील खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक राजेंद्र कौठाळे यांनी खेळाचे गणवेश भेट दिले आहेत .

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.