२९ सप्टेंबरपासून नगरच्या कलाकारांचा 'घुमा ' महाराष्ट्रभर झळकणार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर जिल्ह्यातील तरुण दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे दिग्दर्शित 'घुमा' हा मराठी चित्रपट येत्या २९ सप्टेंबरपासून महाराष्ट्रभर झळकणार आहे.कालच 'घुमा' या चित्रपटातील 'तुज्या नजरेच्या ठिणगीने वणवा पेटला' हे विशेष गाणे रिलीज झाल्याने ग्रामिण भागात चांगलाच वणवा पेटला आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

संगीतकार अजय गोगावले यांनी एक प्रोत्साहन म्हणून हे गीत गायलं आहे. गीतकार गुरु ठाकुर यांचे शब्द आणि संगीतकार जसराज जोशी, ऋषिकेश सौरभ यांचे संगीत लाभलेल्या सिनेमात सर्व नविन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ग्रामिण भागातील तरुणांना 'घुमा' या चित्रपटाची उत्सूकता लागली आहे.

'वणवा पेटला' हे गाणे तरुणांच्या मोबाईलमध्ये वाजताना दिसत असून यंदाच्या नवरात्रीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धुमाकुळ घालणार यात शंका नाही. हा चित्रपट ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवरील वास्तववादी चित्रण असलेला आहे. हा चित्रपट मनोरंजना व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रातील वास्तव मांडणारा आहे.

ग्रामीण भागातीलशाळा, ग्रामीण जीवन, जीवन जगण्याची धडपड अशा अनेक गोष्टी या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहयाला मिळणार आहेत. या चित्रपटाचा नुकताच गाणं प्रदर्शित झाला. घुमाच्या गाण्याला खुपच लोकांनी डोक्यावर घेतलेल दिसून येत आहे.

'घुमा' या चित्रपटाचे लेखक- दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे, निर्माते मदन आढाव, आदिनाथ धायगुडे, संतोष इंगळे, सारंग इंगळे, रावसाहेब काळे; सहायक दिग्दर्शक विक्रम शंकपाळे, अविनाश मकासरे, कार्यकारी निमार्ते मंगेश जोंधळे, व्यवस्थापक अजय थोरात, कलाकार शरद जाधव, पुनम पाटील, आदेश आवारे, तेशवानी वेताळ, शशांक दरणे, प्रमोद कबसे, नाना मोरे, या कलाकारांनी घुमा चित्रपटांमध्ये काम केल आहे.

इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी आणि ग्रामीण भागातील तरुण दिग्दर्शकाला बळ देण्यासाठी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन मित्र, कुटुंबासह 'घुमा' पहावाच.येत्या २९ सप्टेंबर पासून 'घुमा' हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.