हॉटेलमालकाच्या पत्नीचा खून करणाऱ्या नोकरास जन्मठेप.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी येथील हॉटेल साईप्रियाचे मालक राजा सुब्बाराव मांडवा यांच्या घरात कामाच्या बहाण्याने घुसून नोकर वासू ऊर्फ श्रीनिवास मल्लिपुडी व त्याच्या साथीदारांनी मांडवा यांच्या पत्नी गिरिजा यांचा खुन करून घरातील सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरली होती. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याप्रकरणी कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयने आरोपी वासू याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दुसरा आरोपी राजू नडविगेरी हा फरार आहे. नल्लेश नडविगेरी व देवरात मढिवाल या दोघांना न्यायालयाने निर्दोष सोडले. शिर्डी येथील हॉटेल साईप्रियाचे मालक राजा सुब्बाराव मांडवा यांनी आपल्या हॉटेल व घरकामासाठी आंध्रप्रदेशातून काही नोकर आणले होते. 

त्यांनी १३ ऑगस्ट २०११ रोजी संडास व बाथरुमचे काम करण्याच्या बहाण्याने घरात घुसून हॉटेलमालक सुब्बाराव यांच्या पत्नी गिरजा यांचा काथ्याच्या दोरीने व हाताने गळा दाबून खुन केला. त्यानंतर आरोपी घरातील सोने, चांदी व रोकड चोरून फरार झाले होते. 

याप्रकरणी सुब्बाराव मांडवा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३०२ व ३९७ अन्वये गुन्हा नोदंविला होता. आरोपींविरोधात तात्कालीन पोलीस निरीक्षक उगले यांनी तपास करून कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 

याप्रकरणी सरकारी वकील अशोक वहाडणे यांनी साक्षीदार तपासले. घटनेच्या दिवशी शेजारी राहणाऱ्या रजनी आमरनाथ मलीनेडी हिने आरोपींना प्रत्यक्ष बघितले होते. तिची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सर्व साक्षी, पुरावे, वैद्यकीय अहवाल, परिस्थितीजन्य पुरावे सरकार पक्षातर्फे तपासण्यात आले. 

सरकारी वकीलांनी त्यांच्या युक्‍तीवादात सर्व मुद्दे न्यायालयापुढे सिद्ध केले. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून जिल्हा न्यायधीश- २ ए. पी. रघुवंशी यांनी आरोपीस कलम ३०२ अन्वये जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा तर कलम ३९७ अन्वये १० वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे..

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.