मुळा धरण भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दक्षिण नगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले मुळा धरण अखेर भरल्याने या धरणातून मुळा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. धरणाच्या दोन दरवाज्यांमधून पाणी सोडले गेले असून जसजशी आवक वाढेल तसतसा प्रवाह वाढविला जाणार नाहे. जिल्ह्यात व लाभक्षेत्रात पावसाचा जोर बऱ्या प्रमाणात असल्याने विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत माहिती अशी, दक्षिण नगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले मुळा धरण कधी भरेल याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागून होते. काल मुळा धरण ९३ टक्के भरल्याने २६ हजार दशलक्ष घनफूट क्षेत्रात असणारे हे धरण कोणत्याही क्षणी भरून पाणी नदी पात्रात सोडण्यात येईल, अशी माहिती काल पाटबंधारे विभागाचे अभियंता टी.एन.मोरे यांनी दिली होती.

त्यानुसार सायंकाळी ६.३० च्या सुमारास पाणी साठा २५५०० दशलक्ष घनफूट झाल्याने तालुक्याचे आ. शिवाजीराव कर्डिले, नेवासा मतदार संघाचे आ. बाळासाहे मुरकु टे, ज्येष्ठ नेते ॲड. सुभाष पाटील, मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता टी.एन. मोरे,अभियंता शामराव बुधवंत यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कळ दाबून मुळा नदीपात्रात धरणाच्या दोन दरवाजामधून ५४२ क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

त्यानंतर कार्यकारी अभियंता मोरे यांनी सांगितले की, जसजशी आवक वाढेल तसतसा नदीतील प्रवाह वाढविला जाईल. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावे. या धरणाच्या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने नगर शहर, एमआयडीसी, राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी या तालुक्यातील गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.