शिर्डी विमानतळाला सार्वजनिक वापरासाठीचा परवाना मिळाला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी विमानतळाला सार्वजनिक वापरासाठीचा परवाना मिळाला असून आता साईभक्तांना साईबाबांच्या दर्शनासाठी विमानाने शिर्डीला यायला मिळणार आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (डीजीसीए) गुरुवारी दिवसाच्या उड्डाणांसाठी विमानतळाला हा परवाना दिला आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

डीजीसीएच्या एका पथकाने अलीकडेच नवीन विमानतळाचे परीक्षण केले होते. यानंतर हा परवाना प्रदान केला आहे. डीजीसीएच्याएका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नागरी विमान महासंचालकांनी सर्व आवश्यक मानकांचे पालन झाल्याची खात्री पटल्यानंतर शिर्डी विमानतळाला 'एअरोड्रोम' परवाना दिला आहे.

अहमदनगरच्या राहाता तालुक्यामधील हा विमानतळ महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीद्वारे विकसित करण्यात आला आहे. यावर जवळपास ३५० कोटी रुपये खर्च झालेला आहे. यासाठी श्री साईबाबा संस्थान ट्रस्टकडून ५० कोटी रुपये देण्यात आले आहेत. 

या विमानतळाचा रन-वे २५०० मीटर लांब आहे. एका अंदाजानुसार प्रतिदिन जवळपास ६० हजार भक्त शिर्डीतील साईबाबा मंदिराला भेट देत असतात. यातील जवळपास १० ते १२ टक्के पर्यटकांनी आपल्या सेवेकडे आकर्षित करण्याचा विमानतळ अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.