पाथर्डीत किरकोळ कारणावरून पोलीस शिपायास जबर मारहाण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून एका पोलीस शिपायास जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या मारहाणीनंतर करंजी गावात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

चिचोंडी (शिराळ ) येथील एक पोलीस कर्मचारी खासगी कामानिमित्त करंजी येथे आपल्या कुटुंबीयासोबत आला असता, त्याचा करंजी येथील एका व्यक्तीस पायी चालताना धक्का लागला. या वेळी या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि नंतर त्याचे रुपांतर मोठया हाणामारीत झाले. 

या वेळी सबंधित पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी उपस्थित अनेक लोकांना मदतीसाठी आरडाओरड करत होती. मात्र, तिच्या मदतीला कोणीही पुढे आले नसल्याचे समजले. काही वेळाने दोन्ही बाजूचे नातेवाईक येथे गोळा झाले. मात्र, पोलिसाला मारहाण करणारे लोक घरी निघून गेल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. 

त्यानंतर दोन्ही गटाकडून पाथर्डी पोलीस स्टेशनला फिर्यादी दाखल करण्यात आल्या. करंजी येथे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली असून, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही. बाहेरगावच्या लोकांना किरकोळ कारणावरून होणारी हाणमार ही करंजी गावासाठी घातक ठरणारी आहे. 

करंजी येथील पोलीस चौकी आता शोभेची वस्तू बनली आहे. बसस्थानकाजवळ दारूविक्री राजरोसपणे पुन्हा सुरू झाली आहे. करंजी येथील पोलीस चौकीस कायमस्वरुपी चार पोलीस द्यावेत तसेच पोलीस चौकीत पोलिसांनी थांबून रहावे अन्यथा करंजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच रफीक शेख यांनी दिला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.