ज्योत आणण्यासाठी गेलेल्या युवकांचा अपघात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बालमटाकळी (ता.शेवगाव) येथील ग्रामदैवत बालंबिका देवीच्या नवरात्रोत्सवासाठी पद्मावती माता तिरुपती बालाजी येथून दरवर्षी प्रमाणे ज्योत आणण्यासाठी जात असतात. यावर्षी गेलेल्या युवकांचा अज्ञात वाहनाने तेलंगणा राज्यातील कर्नुल जिल्हायामध्ये अपघात झाला आहे. यामध्ये चार युवक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

बालमटाकळी येथुन दरवर्षी बालंबिका देवीच्या नवरात्रोत्सवानिमीत्त 100 युवक पायी ज्योत आणतात. यंदा ते पद्मावती माता तिरुपती बालाजी येथे गेल्या आठवडयामध्ये गेले होते. त्या ठिकाणाहून बालमटाकळीकडे युवक ज्योत घेवून येत होते. मात्र अज्ञात वाहनाने तेलंगना राज्यातील कर्नुल जिल्हायामध्ये रविवार ता. 17 रोजी पहाटे 3 च्या सुमार जोराची धडक दिली.

त्यामध्ये लक्ष्मण संपत फाटे (वय- 32), अमोल हिरालाल लुकड (वय- 26) , राजेंद्र सखाराम सगळे ( वय-45), साहेबराव रंगनाथ धुपे (वय- 47) हे युवक गंभीर जखमी झाले आहेत. यातील धुपे यांची प्रकृती चिंताजनक आहे. चारही जखमींना तेथील ग्रामस्थांनी एका रुग्णवाहीकेतून रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामध्ये वाचलेल्या युवकांसाठी येथील ग्रामस्थांनी 50 हजार रुपये वर्गनी गोळा करुन जघमींच्या औषधौपचारासाठी दिले आहेत.

अपघातानंतरही भास्कर वाघुंबरे, अरुण गरड, भाऊसाहेब बामदळे, दिलीप भाकरे, सुभाष जोशी, संदीप शिंदे व इतर युवक ज्योत पायी घेवून येत आहे. तुळजापूरच्या दर्शनानंतर उदया बालमटाकळी येथे ज्योत येणार आहे. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. हा अपघात झाल्यानंतर सर्व पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी गंभीर युवकांना नगर येथील रुग्णालयात आणण्यासाठी प्रयत्न केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.