आ. कर्डिलेंमुळे मांडवे -शिरापूरचा पाणीप्रश्न सुटला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी तालुक्यातील मांडवे व शिरापूर येथे जलयुक्तच्या माध्यमातून सुमारे दोन कोटीचे कामे पूर्ण केल्याने या दोन्ही गावचे काँक्रिटबंधारे ओसंडून वाहत असून, या सर्व कामांचा लोकार्पण सोहळा व बंधाऱ्यातील पाण्याचे पूजन आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्या सौ. संध्याताई आठरे यांच्या अध्यक्षतेखील शुक्रवार, दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वा. मांडवे येथे होणार आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

तर दुपारी बारा वा. शिरापूर येथे पंचायत समिती सदस्या मनीषा वायकर, सुनील परदेशी, लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार थोरात, उपविभागीय अधिकारी कुमकर, शाखा अभियंता पाटील, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज धनविजय यांच्यासह विविध गावचे सरपंच, उपसरपंच व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

आ. कर्डिले यांच्या माध्यमातून मांडवे येथे जलयुक्तची सुमारे पाऊण कोटीची कामे पूर्ण केल्याने मांडवे गावचे सिंचनक्षेत्र मोठया प्रमाणात ओलिताखाली येणार आहे. मांडवे येथील भापसेवस्ती बंधारा, कुचकरवस्ती बधारा, मेळवस्ती बंधारा, या चार बंधाऱ्यांसाठी सुमारे पाऊण कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

तसेच वनविभाग अंतर्गत डीपीटीसीमधून काही कामे करण्यात आली आहेत. लवांडेवाडा, चुनखवस्ती, जाधव भिसे वस्ती या ठिकाणी देण्यात आलेल्या इंधन विहिरी तसेच जिल्हा परिषद अंतर्गत काँक्रिट बंधाऱ्याचे खोलीकरण व पडदी टाकण्याच्या कामासह सर्व कामांचा लोकार्पण सोहळा व जलपूजन या वेळी होणार आहे. 

दुपारी बारा वा. शिरापूर येथे जलयुक्तमधून करण्यात आलेला सालशिदबाबा बंधारा, शेटेवस्ती बंधारा, कृषी विभागाकडील कम्पार्डमेंट, बंडिंगकामे व बंधारे दुुरुस्ती , वनविभाग अंतर्गत दगडीबांध घालणे, सलग समतलचर खोदणे यासह बुधवंतवस्ती व हनुमान वस्ती येथील प्राथमिक शाळांना संगणक तसेच जिल्हा परिषद अंतर्गत जाधववस्ती व गावाजवळील काँक्रिट बंधाऱ्यास पडदी टाकणे, खोलीकरण करणे या सर्व कामांसाठी सुमारे एक कोटी तीस लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. 

या कामांचा लोकार्पण सोहळा व बांधाऱ्यातील पाण्याचे पूजन आ. कर्डिले यांच्या हस्ते होणार आहे. जवळपास आडीच कोटी रुपये खर्चून या दोन्ही गावचा पाणीप्रश्न या माध्यमातून मार्गी लावण्याचे काम आ. कर्डिले यांनी केले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मांडवे -शिरापूर ग्रामस्थांनी केले आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.