पोलिस भरतीच्यावेळी खोटा जन्मदाखला देऊन फसवणूक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरात पोलिस भरतीच्यावेळी खोटा जन्मदाखला देऊन शासनाची फसवणूक केल्याच्या खटल्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश भावके यांनी आरोपी जगन्नाथ विश्वनाथ मगर (रा. पिंपळगाव उज्जैनी, ता.नगर) याला दोषी धरून आपिलात तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा कायम केली. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २०/१२/१९९३ रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान नगर शहरात पोलिस मुख्यालय येथे पोलिस भरतीच्यावेळी वय जास्त असल्याने शाळा सोडल्याच्या दाखल्यावर खोटी जन्मतारखेची नोंद करून व खोटा दाखला तयार केला होता

नंतर त्यावर मुख्याध्यापक व हायस्कूलचे खोटे सही व शिक्के करून बनावट दाखला खरा आहे असे भासवून महाराष्ट्र शासनाची फसवणूक केली व भरती झाला म्हणून आरोपी जगन्नाथ विश्वनाथ मगर (वय ५१,रा. पिंपळगाव उज्जैनी, ता. नगर) याचेविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात भादवि ४२०/४७१/४६८/४६५ अन्वये गुन्हा दाखल केला.

सदर खटल्यात मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी मगर याला भादंवि ४२० अन्वये दोषी धरून तीन वर्षे शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या निकालाविरुद्ध आरोपी मगर याने जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केली होती. या अपिलाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश भावके यांचे समोर झाली.

न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ४७१ अन्वये दोषी धरून तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा कायम केली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील ॲड.मोहन पी.कुलकर्णी यांनी काम पाहिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.