भगवानगडाच्या पायथ्याशी असणा-या गावांचा मेळाव्याला विरोध.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीक्षेत्र भगवानगड हे स्थान राजकारण विरहित आहे. त्याचे पावित्र्य जपावे म्हणून प्रशासनाने दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी कुठल्याही मेळाव्यास परवानगी देऊ,नये असे निवेदन तालुक्यातील राणेगाव व शिंगोरी येथील ग्रामस्थांनी तहसिलदार दीपक पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

श्रीक्षेत्र भगवानगड हे आम्हा भक्तांचे गुरु परंपरेचे श्रध्दा स्थान आहे. १९५१ साली दस-याच्या दिवशी गडाची स्थापना झालेली असून तो दिवस गडाचा वर्धापन दिन म्हणून स्रव भक्तजण धार्मिक पध्दतीने व परंपरेने साजरा करीत असतात.

येथे राजकीय व्यक्तींच्या भाषणामुळे गोंधळ, गडबड व भांडणे होण्याची दाट शक्यता असून यापुर्वी असे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे धार्मिक स्थळाच्या परंपरेला धक्का बसु शकतो. म्हणून भगवानगड या धार्मिकस्थळी कोणत्याही राजकीय व्यक्तिस मेळावा घेण्यास परवानगी देवू नये. असे निवेदनात म्हटले आहे.

प्रशासनाने अतातायी भुमिका घेतल्यास भाविकांना वेगळा विचार करावा लागेल. या मेळाव्यास गर्दी जमावी म्हणून काही राजकीय व्यक्ती विनवाकारण वाद उपस्थित करुन आपली राजकीय पोळी भाजवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू भगवानगडाच्या पायथ्याशी असणा-या गावातील जनता गडाचे महंत डाँ. नामदेव शास्त्री यांच्याबरोबर आहेत.

त्यांनी घेतलेली भुमिका योग्य आहे. आम्ही सर्वजण भगवान बाबांना मानणारे भक्त आहोत.त्या गादीवर शास्त्री असल्यामुले गादीच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी असे कोनोशीचे सरपंच राजेंद्र दौंड म्हणाले.

राणेगांव शिंगोरी प्रमाणेच नागलवाडी, कोनोशी, गोळेगाव, पिंगेवाडी, दैत्यनांदुर, प्रभुवाडगाव येथील ग्रामस्थही प्रशासनाला निवेदन देणार असल्याची माहीती दौंड यांनी दिली. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य प्रभाकर चेमटे, संदीप बोडखे, उध्दव वाघ, केदारेश्वरचे संचालक श्रीकिसन पालवे, संदीप बोडखे, बाळासाहेब फुंदे, नंदकुमार मुंढे, नागलवाडीचे सरपंच गोरक्ष खेडकर, नागलवाडीचे बाळासाहेब ढाकणे, प्रभुवाडगावचे रमेश दिघोळे यांच्यासह २०० ग्रामस्थांच्या सहया आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.