अण्णा हजारेंच्या पत्रांना उत्तर न दिल्याने मोदींविरोधात डिजीटल आंदोलन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ज्येष्ष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पत्रांना उत्तर देण्यास टाळाटाळ करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अण्णांच्या पत्रांना उत्तर द्यावे, तसेच लोकपाल व शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी पारनेर येथील नागेश्वर मित्र मंडळाच्या युवकांनी रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या फेसबुक, व्टिटर व ईमेलवर मॅसेज़ पाठविण्यास सुरुवात केली आहे. ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या अडीच वर्षांत लोकपालची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. या पत्रांना पंतप्रधान कार्यालयाने केवळ कार्यवाही सुरू आहे. लवकर निर्णय घेण्यात येईल, असे त्रोटक उत्तर दिले आहे. यामुळे अण्णा हजारे यांनी लोकपाल व शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, यासाठी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून पुन्हा दिल्ली येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

हजारे यांच्या पत्राला तातडीने उत्तर मिळावे म्हणून पारनेर येथील नागेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष सखाराम बोरुडे, कल्याण थोरात, समीर शेख, नजीर तांबोळी, सुहास मोढवे, गणेश कावरे, धीरज महांडुळे, अनिकेत रमेश औटी, रायभान औटी, संदीप खेडेकर, सचिन बडवे,डॅ. नरेद्र मुळे, उदय शेरकर, प्रमोद गोळे दत्ता शेरकर, राजेंद्र म्हस्के, सतीश म्हस्के, मनोज गंधाडे, विनोद गोळे, हौशिराम वाढवणे, सतीश इंगळे या युवकांनी डिजीटल आंदोलन सुरू केले आहे. 

यामध्ये पंतप्रधानांचे फेसबुक पेज, व्टिटर, ईमेलवर पंतप्रधान मोदीजी,अण्णा हजारेंच्या पत्रांना उत्तर द्या, लोकपालची व स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, असे मेसेज पाठवणार आहेत. पारनेर शहरासह तालुकयातून सुमारे पाच हजार मेसेज सोशल मीडियावर धडकणार असून, मोदी यांच्या डिजीटल इंडियाला डिजीटल आंदोलनातूनच उत्तर देणार असल्याचे युवकांनी सांगितले.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.