पतंजली डिलरशीपचे आमिष दाखवून नगरसह राज्यभर ५० लाखांचा गंडा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पतंजलीच्या उत्पादनांची डिलरशिप देण्याचे आमिष दाखवून नगर जिल्ह्यासह राज्यभर ५० लाखाला गंडा घालणाऱ्या आरोपीस सायबर पोलिसांच्या कामगिरीमुळे बिहार येथे जेरबंद करण्यात आले आहे.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

 या आरोपीने राज्यातील नगर, धुळे, नाशिक, जळगाव, पुणे, कोल्हापुर, सोलापूर, अकोला तसेच तामिळनाडू, गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश या राज्यातील लोकांचीही फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर जिल्ह्यातील राहुरी येथील देविदास हौशिनाथ दहिफळे (वय ४१) यांना पंतजली स्टोअरची डिलरशिप देण्याच्या नावाखाली ३ लाख रुपयांची फसवणुक केल्याची घटना दि. ४ ऑगस्ट रोजी घडली होती. 

याप्रकरणी राघवेंद्रसिंह नावाच्या व्यक्तीने दहिफळे यांच्याशी संपर्क साधत त्यांना वेबसाईटवर अर्ज भरून बॅकेत रक्कम भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना बनावट सर्टिफीकेट देत त्यांची फसवणुक केली. दि. ३० ऑगस्ट रोजी याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.