पंकजा मुंडे गडाच्या मानसकन्या असतील तर मग कन्येला माहेरी येण्यास विरोध का ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दसरा मेळावा भगवान गडावरच घेण्याचा निर्धार पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी केल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री विरुद्ध पंकजा मुंडे हा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. मुंडे समर्थकांनी महंतांवर जाहीर व्यासपीठावरून केलेली टीका व महंतांनी मुंडे समर्थकांना गडावर गेल्यानंतर दिलेली वागणूक, यामुळे हा वाद आणखी पेटला आहे. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

दसरा मेळावा भगवान गडावरच व्हावा, यासाठी शेवगाव -पाथर्डीसह बीड भागातील कार्यकर्तेही सक्रिय झाले आहेत. गडाच्या विश्वस्त मंडळाने एकमताने ठराव घेऊन गडावर राजकीय भाषण होणार नाही, कोणत्याही व्हीआयपीला निमंत्रण दिले नाही. सभा, मेळावा व उद्घाटनाच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, असे लेखी पत्र प्रशासनाला महंतांनी दिले आहे. 

मुंडे समर्थक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून गडावरच मेळाव्याला प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी करणार आहेत. पाथर्डीच्या तहसीलदारांना तसे परवानगी मागणारे पत्र मुंडे समर्थकांनी सोमवारी दिले. महसूल प्रशासन यामुळे अडचणीत सापडणार आहे. 

गडाचा कायदेशीर ताबा विश्वस्त मंडळाकडेच आहे. लोकभावना व समाजभावना मात्र मुंडे यांच्या सोबत असल्याचे दिसते. परवानगी मागणारे गड भगवान भक्तांचा आहे, असे म्हणतात. तर महंत राजकारण्यांना गडावरून भाषण करू देणार नाही, यावर ठाम आहेत. 

महसूल व पोलिस प्रशासनाला नियमानुसार सर्वकाही करून कायदा व सुव्यवस्था आबादीत राखण्याचे काम करावयाचे आहे. भारतीय जनता पक्षातूनच पंकजा मुंडे यांना अंतर्गत विरोध असल्याचा आरोप मुंडे समर्थकांनी जाहीरपणे केला आहे. 

नियोजनाच्या बैठकीत मंहतांना राजकीय इच्छाशक्ती असल्याचेही सांगितले गेले. पंकजा मुंडे गडाच्या मानसकन्या असतील तर मग कन्येला माहेरी येण्यास विरोध का होतो ? यामागे आणखी कोण कोण आहे ? असे प्रश्न मुंडे यांचे समर्थक उपस्थित करीत आहेत. भगवान गडाचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणीही पुढे येत आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.