जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे पालकमंत्र्यांना साकडे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्ह्यातील मोडकळीस असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची संख्येत वाढ झाली असून शाळेच्या इमारती दुरूस्ती साठी वाढीव निधी मिळावा यासाठी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या वतीने पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना साकडे घातले आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN


शुक्रवार (दि.1) रोजी सकाळी 11 वाजता शिक्षण समितीची बैठक जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले यांच्या अध्येक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, शिवाजी गाडे, विमल आगवण, मिलिंद कानवडे, सुवर्णा जगताप, राहुल झावरे, शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले, उपशिक्षणाधिकारी सुनंदा ठुबे उपस्थित होते.

या बैठकी दरम्यान नगर तालुक्‍यातील निंबोडी येथील दुर्घट्‌णेत मयत झालेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच तालुकास्तरावरून आलेला शाळांचा अहवला नुसार धोकादायक इमारती मध्ये विद्यार्थ्यांना बसू नये याबाबत गटशिक्षणधिकाऱ्यांना सुचणा देण्यात आल्या.

निंबोडी दुर्घटनेतील विद्यार्थ्यांचा दवाखान्याचा खर्च जिल्हा परिषदे मार्फत करण्यात यावा अशा सुचना यावेळी देण्यात आला. तर जिल्हा परिषद शाळांच्या इमारत बांधकामास गट शिक्षणअधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी भेटी देऊन बांधकामाचा दर्जा उच्च प्रतीचा राहील याची दक्षता घेण्याचे सुचना घुले यांनी केल्या.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.