सर्वसामांन्य जनता हाच केंद्रबिंन्दु मानून चोवीस तास माझी ओपीडी सुरू - आ.कर्डिले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील सिद्धीविनायक सामाजिक प्रतिष्ठानने गेली अकरा वर्षात गणेशोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान, नेत्रदान, कपडे वाटप, शालेय साहित्य वाटप सारखे विविध सामाजिक उपक्रम हाती घेवून एक चांगला आदर्श गणेश मंडळासमोर ठेवला आहे. या मंडळाचे कार्य निश्चितच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN


शुक्रवारी(दि.१) सकाळी सिध्दीविनायक प्रतिष्ठान व अष्टविनायक ब्लड बँक नगर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीराचे उद्धाटन आ. कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे होते.

ते म्हणाले की, या मंडळाने तिसगावच्या नावलौकीकात भर टाकली असून आ. कर्डिले यांनी आमच्या एका शब्दावर दहा लाखाचा निधी गावासाठी दिला. चांगलं काम करणाऱ्यांचे आम्ही जाहीरपणे कौतूक करणारे माणस असून राजकारणात कोणी कोणाचा कायमचा विरोधक नसतो. मी कधीही कोणाबरोबर द्वेशाने राजकारण केले नाही. आ. कर्डिले यांनी देखील आमच्याकडे न पहाता गावाकडे बघून या गावासाठी भरीव निधी दयावा असे आवाहन करत मन चंगा तो कटूतामे गंगा, या आपल्या खास शेरोशायरीत लवांडे पाटील एकमेकांमधील राजकीय कटुता कमी करण्याचा संदेश दिला.

यावेळी आ. कर्डिले आपल्या खास राजकीय शैलीत बोलतांना म्हणाले की, विकासकामे करतांना मी कधीही राजकारण डोळ्यासमोर ठेवून निधी दिला नाही. जो काम घेवुन येईल त्याला मदत करण्याचेच काम आतापर्यत केले आहे. सर्वसामांन्य जनता हाच केंद्रबिंन्दु मानून चोवीस तास माझी ओपीडी सुरू असते. म्हणुनच पंचवीस वर्षे आमदार म्हणुन जनतेची सेवा करता आली. जो देगा उसका भला और जो ना देगा उसकाभी भला अशा शब्दात आ. कर्डिले यांनी टोला लगावला.

या कार्यक्रमास सिनेअभिनेता सोनू वाटमारे, जि. प सदस्य पुरूषोत्तम आठरे, पं.स सदस्य सुनील परदेशी, माजी जि. प सदस्य बाबा खर्से, सरपंच विजया लवांडे, उपसरपंच इलियास शेख, माजी सरपंच भाउसाहेब लोखंडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब लवांडे, युवानेते विक्रमराव ससाणे, धीरज मैड,गणेश गारदे,ग्रा. पं. सदस्य भाउसाहेब लवांडे, नंदकुमार लोखंडे, रफीक शेख, संदीप बर्डे, शंकरराव कातरवडे यांच्यासह सिध्दीविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ कातरवडे, उपाध्यक्ष महेश लोखंडे, कल्याण लवांडे, सचिव सोमनाथ वांढेकर, सदस्य योगेश मैड, गणेश जंगम, गणेश उंडाळे, दिपक लोढा, बाळासाहेब म्हस्के, संदीप पाठक, ॲड. महादेव आठरे, लक्ष्मण गवळी, बाळासाहेब गुगळे आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.