नेवासे तालुक्यामध्ये २० लाखांची गायीची कातडी पकडली.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासे तालुक्यातील सलाबतपूरमध्ये पोलिसांनी गुरुवारी रात्री १० वाजता छापा टाकून २० लाख रुपये किमतीची गायीची कातडी व कातडी वाहतूक करणारी रिक्षा पकडली. शेवगाव विभागाचे पोलीस उपअधिक्षक अभिजित शिवथरे यांच्या पथकाने नेवासा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
                              

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत सविस्तर माहिती अशी, सलाबतपूरमध्ये गायीच्या कातड्याची खरेदी-विक्री व साठवणूक केली जात असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक अभिजित शिवथरे यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली. शिवथरे यांनी त्यांच्या पथकासह नेवासेचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांना सलाबतपूरला बोलावले. तेथे गुरुवारी रात्री १० वाजता शिवथरे यांच्या पथकाने बाबू सय्यद यांच्या घरी छापा मारला असता दोन खोल्यात गायीच्या कातड्यांच्या दोन थप्प्या लावलेल्या आढळून आल्या.

खोलीतील तिघांना पोलिसांनी पकडले. यात बनू शेख, आजम शेख, तौसिफ शेख (सर्व रा. सलाबतपूर) यांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी आम्ही कामगार असून मालक बाबू सय्यद व राजू सय्यद असल्याचे सांगितले. या कातड्यांची वाहतूक करणारी एक रिक्षाही छाप्यात पोलिसांनी जप्त केली. 

सय्यद यांच्या घरात सापडलेल्या गायीच्या कातड्यांची बाजारभावानुसार किंमत २० लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अंकुश पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी बाबू सय्यद, राजू सय्यद, बनू शेख, आझम शेख, तौसिफ शेख, आवेज शेख, कलंदर शेख, अजहर शेख, भैय्या शेख (सर्व रा. सलाबतपूर) या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक शिवथरे यांच्या पथकाने नेवासा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई यशस्वी केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.