जनता निवडून देते, म्हणून राजकारणात संधी मिळते - डॉ सुजय विखे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जनता निवडून देते, म्हणून राजकारणात संधी मिळते. सहा ग्रामपंचायत सदस्यांनी संधी दिली, म्हणून सरपंचपद मिळते. सोसायटीत ९ लोकांनी संधी दिली, म्हणून अध्यक्षपद मिळते व १३ नगरसेवकांनी निवडून दिले, तर नगराध्यक्षपद मिळते आणि सव्वा दोन लाख मतदारांनी विजयी केले, की आमदारकी मिळते. त्यामुळे पद घेऊन शेवटच्या घटकातील लोकांचे प्रश्न मार्गी लावले नाही, तर काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आपण राजीनामाही घेऊ, असे खडे बोल डॉ. विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी सुनावले.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

साई एम्प्लॉइज सोसायटीच्या विजयी संचालकांच्या सत्कारप्रसंगी डॉ. विखे बोलत होते. ते म्हणाले, सरपंच, अध्यक्ष, उपसरपंच झालो, म्हणजे आपण मोठे झालो, असे मानणे बरोबर नाही. सामान्य माणसाच्या अडीअडचणी, त्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी मी मतदारांसमोर नम्र होत असताना पदाधिकारी जर तसे वागणार नसतील, आपल्या सर्व सदस्यांना विचारात घेऊन काम करणार नसतील, तर अशा पदाधिकाऱ्यांचा आपण वेळप्रसंगी राजीनामा घेऊ.

घरात बसून प्रोसिडिंग लिहिणारा सरपंच व सदस्यांना विचारात न घेणारा नगराध्यक्ष किंवा सेवा संस्थांचा अध्यक्ष यापुढे चालणार नाही. जनहिताच्या कामांना प्राधान्य द्या, कामे मार्गी लावा, अशा सूचना त्यांनी दिल्या..

सोसायटीची निवडणूक संपली आहे. पराभूत उमेदवारांचेही योगदान मिळालेले आहे. त्यामुळे इथून पुढे सर्वांना बरोबर घेऊन कामे करायची आहेत. सर्वांसाठी आमचे दरवाजे खुले आहेत. मतदारसंघातील चित्र बदलण्यासाठी आपली भूमिका असून त्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे डॉ. विखे यांनी सांगितले.

यावेळी सर्व नूतन संचालक, पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, नगरसेवक अभय शेळके, विजय कोते, सोसायटीचे अध्यक्ष प्रताप कोते, उपाध्यक्ष जितेंद्र गाढवे, प्रचार प्रमुख नाना गुरव, यादवराव कोते, बाबासाहेब डांगे, श्रद्धा कोते आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.