39 मृत विद्यार्थ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, जिल्‍हा परिषदेची असंवेदनशिलता.


दैनिक दिव्य मराठी :- नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत कोसळून झालेल्या अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री राम शिंदे यांनी चार लाखांच्या धनादेशांचे वाटप केले. तथापि, वर्षभरात अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ३९ विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना अजून राजीव गांधी अपघात विमा योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. निंबोडी येथील घटनेनंतर मंगळवारी (२९ ऑगस्ट) या फायलींवरची धुळ झटकायला प्रशासनाला वेळ मिळाला. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या फायली मंजुरीसाठी संबंधित समितीसमोर ठेवल्या आहेत.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

धोकादायक, तसेच मोडकळीस आलेल्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याचे दिव्य मराठीने २०१५ पासून लक्ष वेधले होते. धोकादायक ४३४ वर्गखोल्यांपैकी २३० खोल्या पाडण्यात आल्या. परंतु अजूनही २०४ धोकादायक वर्गखोल्यात विद्यार्थी मुठीत जीव घेऊन शिक्षण घेत आहेत.

निंबोडी येथील घटनेत शाळा धोकादायक नसताना, तसेच सतरा वर्षांपूर्वीच बांधकाम असतानाही कोसळली. या घटनेत तीन निष्पाप विद्यार्थ्यांना जीव गमावावा लागला. या घटनेनंतर जिल्हा परिषद प्रशासनाचे धाबे दणाणले. सरकारकडून कुटुंबीयांना चार लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली. 

जिल्हा परिषदेमार्फत राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनंेतर्गत ७५ हजार रुपये मदत दिली जाते. या मदतीसाठी जिल्हा परिषदेकडून संबंधित समितीकडे प्रस्ताव ठेवला जातो. यात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना ७५ हजार, तर अपंगांना तीस ते साठ हजारांपर्यंत मदत दिली जाते. 

जिल्हा परिषदेकडे वर्षभरापासून सुमारे ४० मुलांचा अपघात झाल्याची नोंद आहे. त्यात ३९ विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले. अपघात विविध कारणांनी झाले असले तरी त्यांना राजीव गांधी योजनेचा लाभ देण्यात तत्परता दाखवण्यात आली नाही.

धोकादायक शाळांचे आठ नवीन प्रस्ताव
निंबोडीच्या घटनेनंतर धोकादायक आठ शाळांचे नवीन प्रस्ताव शिक्षण विभागात दाखल झाले आहेत. या प्रस्तावात जिल्ह्यातील १९ वर्गखोल्यांच्या निर्लेखनाची गरज मांडण्यात आली आहे. त्यामुळे ही संख्या अजून वाढणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

त्या प्रस्तावांना नुकतीच मंजुरी घेतली
जिल्ह्यात यापूर्वी राजीव गांधी अपघात योजनेंतर्गत ७० प्रस्ताव आले होते. त्या प्रस्तावांना निधी उपलब्ध झाल्यानंतर नुकतीच मंजुरी देण्यात आली. आलेल्या उर्वरित ३९ प्रस्तावांनाही संबंधित कमिटीची मंजुरी घेण्यात आली आहे. - रमाकांत काठमोरे, जिल्हा शिक्षणाधिकारी.

आजीनंतर मुलीच्या निधनाचा धक्का
निंबोडी येथील प्रकाश पोटे यांच्या आजीच्या निधनानंतर सोमवारी तेरावा विधी होता. पोटे कुटुंबीय या दु:खातून सावरले नाही, तोच तेराव्याच्या दिवशी शाळेचे छत कोसळले. त्यात प्रकाश पोटे यांची एकुलती एक मुलगी वैष्णवी हिचा या अपघातात मृत्यू झाला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.