श्रीरामपूर मध्ये मृत व्यक्तीच्या ३० लाखांचा अपहार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर तालुक्यातील आयसीआयसीआय बॅँकेच्या शाखेत महानुभाव आश्रमातील गुरू अमृतलाल चावल यांचे खाते होते. या खात्यात ३० लाख ४० हजार ७०० रुपये जमा होते. दरम्यान, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा संबंधित खात्यातील रक्कम काढण्यासाठी बॅँकेत गेला असता या खात्यातील रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी बॅँकेकडे वेळोवेळी तक्रार करूनही उडवाउडवीची उत्तरे दिली गेल्याने आजअखेर सहाजणांविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

सचिन बोेंबले, रवि बनकर, विनायक मोरे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रिया आयर राजन, प्राची भोगले यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील महानुभाव आश्रमातील गुरू अमृतलाल चावल यांचा २३ फेब्रुवारी २०१७ रोजी मृत्यू झाला.

नोकरीनिमित्त अमेरिकेत असलेला त्यांचा मुलगा प्रविण चावला हा त्यांच्या अंत्यविधीनिमित्त शहरात आला. अंत्यविधीनंतर प्रविण याने जितेश मोहन जुनवेजा (रा. काझीबाबा रोड, सुभेदार वस्ती,) यांना वडिलांचे आयसीआयसीआय बॅँकेत खाते असल्याचे सांगितले. 

त्यानंतर दोघांनी बँकेत जावून चौकशी करून बँक खात्याचा तपशिल घेतला. त्यावेळी काही रक्कम या शाखेचा मॅनेजर सचिन बोंबले याच्या वैयक्तिक खात्यावर जमा झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बँक मॅनेजरला विचारणा केली असता त्यांनी काहीही माहित नसल्या बाबत सांगितले. 

त्यानंतर दोघांना बँकेच्या मुख्य शाखेच्या (मुंबई) चंदा कोचर यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी बँकेच्या वतीने समिती नेमून तक्रारीचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर प्रविण चावला हा कामानिमित्त अमेरिकेला गेले. 

त्यानंतर त्यांनी वेळोवेळी ईमेलद्वारे बॅँकेशी संपर्क साधाला असता बॅँकेच्या वरिष्ठ अधिकारी रवी बनकर, विनायक मोरे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रिया आयर राजन, प्राची भोेगले यांच्याकडून खोटी आश्वासने देण्यात आली.

त्यानंतर प्रविण चावला यांनी ४ ऑगस्ट २०१७ रोजी जितेश जनवेजा यांना गुन्हा दाखल करण्याचे अधिकार पत्र दिले. त्यानुसार जानवेजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील सहाजणांंविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.