नगर जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार आहे. त्यासह ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी सात ऑक्टोबरला मतदान व नऊ ऑक्टोबरला मतमोजणी होईल, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ११ ऑक्­टोबरला निवडणुकांचा निकाल प्रसिद्ध होईल. डिसेंबरमध्ये ७० आणि नाव्हेंबरमध्ये १३५ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

या ग्रामपंचायतींमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू झाली असून  तहसीलदार सात सप्टेंबरला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. त्यानंतर १५ ते २२ सप्टेंबरदरम्यान अर्ज सादर करता येतील. अर्जांची छाननी २५ सप्टेंबरला होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत २७ सप्टेंबरपर्यंत आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करून उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल.

निवडणुका होणाऱ्या गावांची तालुकानिहाय नावे.
अकोले : गुहिरे , चास , सोमवलवाडी, भंडारदरा, अंभोळ, शिळवंडी, शेंडी, लहित खुर्द, मुर्शद, वाकी.

संगमनेर : निंबोळे, निमगाव भोजापूर, कोळवाडे, गुंजाळवाडी, चिकणी, जांभुत बु।।, धांदरफळ खुर्द, निळवंडे, रणखांब, हंगेवाडी, निमगाव जाळी, मालुंजे, कर्जुले पठार, धांदरफळ बु।।, रहिमपूर, करुले, घुलेवाडी, दरेवाडी, सादतपूर, सायखिंडी, पोखरी हवेली, डोळासणे, ओझर खुर्द, वरझरे खुर्द, कनकापूर, उंबरी बाळापूर, कोल्हेवाडी, जोर्वे, वडझरी बु, पिंपरणे, चिंचोली गुरव, अंभोरे, निमोण, तळेगाव दिघे, खराडी, जांभुळवाडी, वाघापूर, साकूर, .

कोपरगाव : बहाराबाद, बक्तरपूर, चासनळी, दर्डे कोऱ्हाळे, , पढेगाव, मोरर्विस, शहापूर, वडगाव, डाऊच बु।।, रांजणगाव देशमुख, खिर्डी गणेश, माहेगाव देशमुख, हंगेवाडी, वेस सोयेगाव, भोजडे, कोळपेवाडी, सडे, शिंगणापूर, करंजी बु।।, बहादूरपूर, खोपडी, चांदेकसारे, धारणगाव, तळेगाव मळे, सोनेवाडी.

राहाता : नांदूरर्खी खुर्द, नांदुरर्खी बु।।, राजुरी, डोऱ्हाळे, साकुरी, खडकेवाके, सावळीविहरी, न. पा. वाडी, निघोज, रांजनखोल, लोहगाव, आडगाव खु।।, .

नेवासे : माका, हंडीनिमगाव, गोधेगाव, हिंगोणी, खउपटी, शिरेगाव, माळी चिंचोरा, सुरेशनगर, चिंचबन, कांगोणी, वडाळा बहिरोबा, भेंडा खुर्द, .

शेवगाव : खामगाव, रांजणी, सुलतानपूर खु।।, प्रभुवडगाव, जोहरापूर, आखेगाव, अमरापूर, वाघोली, दहिगावने, कुराडगाव (रावतळे), भायगाव, खानापूर, .

पाथर्डी : कोल्हार, निवडुंगे, मोहरी, भालगाव, वैजुबाभुळगाव, कोरडगाव, सोनोशी, वडगाव, कोळसांगवी, जिरेवाडी, तिसगाव, .

कर्जत : म्हाळी, कौडाने , आळसुंदे, मुळेवाडी, कोपर्डी, बहिरोबावाडी निबे, कापरेवाडी, .

श्रीगोंदे : चवरसांगवी, घोगरगाव, तरडगव्हाण, बनपिंप्री, थिटेसांगवी, माठ, तांदळी दुमला, बेलवंडी बु।।, काष्टी, पारगाव खुर्द.

पारनेर : करंदी, पिंपळगावतुर्क, म्हस्केवाडी, कोहकडी, पाडळी कान्हूर, सिद्धेश्वरवाडी, हत्तलखिंडी, चोंभुत, गुणोरे, गुणेवाडी, ढवळपुरी, वनकुटे, पळशी, भाळवणी, गोरेगाव, भेंद्रे.

राहुरी : कोंडवळ, खडांबे खुर्द, ब्राम्हणगाव भांडे, मांजरी, मनोरी, .

जामखेड : राजुरी, शिऊर, रत्नापूर.

नगर : आगडगाव, सोनेवाडी, चास, दहिगाव, बाबुर्डी बेंद, कापूरवाडी, नागरदेवळे, पिंपळगाव कौडा, सारोळा कासार, शेंडी, सोनेवाडी पिला, टाकळी खातगाव, वडगावळ तांदळी, मदडगाव, पांगरमल, उक्कडगाव, वाळकी, जखणगाव, कौडगांव जांब, नारायणडोह, साकत, आठवड, खातगाव टाकळी, नांदगाव, नेप्ती, रांजणी, पिंपळगाव लांडगा, राळेगण, सारोळा बद्दी.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.