चांगल्या कामांमुळे राज्यातील भ्रष्टाचारी बकासुरांचा नायनाट: ना. राम शिंदे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना चांगले देखावे असणे महत्वाचे असते. शिववरद प्रतिष्ठानने सादर केलेला 'बकासुराचा वध' देखावा सर्वांचे आकर्षण ठरत आहे. अशा अनिष्ठ व असुरी प्रवृत्तीरुपी बकासुरांचा नायनाट होणे आवश्यक आहे. राज्य सरकारने केलेल्या चांगल्या कामांमुळे राज्यातील अनेक भ्रष्टाचारी बकासुरांचा नायनाट होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना.राम शिंदे यांनी केले.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

भाजपाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष, नगरसेवक किशोर डागवाले यांच्या शिववरद प्रतिष्ठानने सादर केलेल्या 'बकासुराचा वध' या भव्य आकर्षक देखाव्याचे उद्घाटन पालकमंत्री ना. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.दिलीप गांधी होते.

किशोर डागवाले भाजपमध्ये आल्याने भाजपाची ताकद वाढली
यावेळी बोलताना खा. गांधी म्हणाले, नगर शहरामधील मध्यनगर भाग हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. आता किशोर डागवाले भाजपमध्ये आल्याने भाजपाची ताकद वाढली आहे. त्यांनी भाजपाला वाहून घेतले आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवून त्यांच्या सुख-दु:खामध्ये सहभागी होत आहेत. प्रभागातील नागरिकांकरीता विविध योजना राबवून कुटूंबे सुरक्षित करत आहेत.

देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसागर
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात डागवाले म्हणाले, प्रतिष्ठान दरवर्षी भव्य व आकर्षक देखावे सादर करण्याची परंपरा जोपासत आहे. हे देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसागर लोटतो. प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत प्रभागातील नागरिकांचा विमा उतरुन कुटुंबे सुरक्षित केली असल्याचे ते म्हणाले. 

याप्रसंगी उपमहापौर श्रीपाद छिंदम, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अंजली देवकर, भाजपा सरचिटणीस किशोर बोरा, मंडळाचे अध्यक्ष सचिन चवंडके, गौतम दीक्षित, रंगनाथ डागवाले, गोरख डागवाले, सुभाष दारवेकर, सचिव सागर गोरे, कार्याध्यक्ष नितीन डागवाले, उपाध्यक्ष रोहन डागवाले, खजिनदार सचिन भिंगारकर, रोहन लेंडकर, गणेश चवंडके, अनिल शिंदे, सुनिल सुर्यवंशी, अस्लम शेख, विशाल भालेराव, मंदार पळसकर, सागर चवंडके आदिंसह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष सचिन चवंडके यांनी आभार मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.