संगमनेर तालुक्यातील माळवाडी परिसर भूकंपांच्या धक्क्यांनी पुन्हा हादरला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील माळवाडी, केळेवाडी हा परिसर पुन्हा भूकंपांच्या धक्क्याने हादरला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. कधी कमी तर कधी जास्त धक्के बसत असल्याने काय करावे असा प्रश्न ग्रामस्थांपुढे निर्माण झाला आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

गेल्या काही दिवसांपासून बोटा, माळवाडी, केळेवाडी परिसराला भूकंपाचे सौम्य धक्के बसत होते. पण मंगळवार दि.१९ सप्टेंबर रोजी सकाळपासून या परिसरात भूकंपाचे धक्के बसू लागले आहेत. संध्याकाळी सात ते साडे सात वाजेच्या सुमारास दोन धक्के तीव्रतेने बसल्याने ग्रामस्थ अक्षरश: घाबरुन गेले आहेत..

जमिनींमधून आवाज येणे, जमिन हादरणे अशा पद्धतीने धक्के बसत आहेत. नेमकी हे धक्के कशामुळे बसतात. धक्क्यांची मालिका किती दिवस चालणार आहे असा सवालही संतप्त झालेल्या या ग्रामस्थांनी केला आहे. 

काही महिन्यांपुर्वी नाशिक येथील मेरी संस्थेचे शास्त्रज्ञांनीही या परिसराला भेट देवून परिसराची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवादही साधला होता. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातूनही परिसरात पथनाट्य सादर करण्यात आले होते. पण आता मंगळवारी बसलेल्या धक्क्यांची तीव्रता जास्त असल्याचेही नागरिक सांगत आहेत. 

या धक्क्यांमुळे घरामधील लहान मुलेही घाबरुन जातात. याच परिसराला भूकंपाचे धक्के कसे काय बसतात यावर काय काय उपाययोजना करता येतील. त्या उपाययोजना संबंधित विभागाने कराव्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.