पंकज़ा मुंडे यांना कोणताही वाद ओढावून न घेता सन्मानाने आमंत्रित करावे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विज़यादशमीच्या दिवशी भगवान गडावर होणाऱ्या मेळाव्यास ग्रामविकासमंत्री पंकज़ा मुंडे यांना गडाच्या व्यवस्थापनाने कोणताही वाद ओढावून न घेता सन्मानाने आमंत्रित करावे, असे आवाहन नगर तालुका बहुजन समाज समितीच्या वतीने बाळेवाडीचे सरपंच प्रकाश पालवे यांनी केले आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

भगवान गडामुळे वंजारी समाजाबरोबरच बहुजन समाजाला सन्मान मिळाला आहे. भगवान गडावरील दसरा मेळाव्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे.लोकनेते गोपीनाथ मुंडे याच गडावरून विचारांचं सोनं घेऊ न पुढील दिशा ठरवायचे. गडावर दसरा मेळावा झाला नाही तर समाज दिशाहिन होऊ शकतो, समाज संघटित ठेवण्याचे काम संत महंतांनी केले असून, हे काम गडावरील महंतांनी करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी नगर तालुक्यातून दोन हजार मोटारसायकलींची रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचे नियोजन माजी सरपंच अशोक पोटे, सरपंच सुधीर पोटे, माजी सरपंच संतोष पालवे, माजी सैनिक संघाचे शिवाजी पालवे, संभाजी पालवे, अक्षय पालवे, अनिल पालवे, तुषार पोटे, युवराज पोटे आदी करणार असल्याचे पालवे यांनी या वेळी सांगितले. हा प्रश्न भावनिकतेचा असल्याने तो सामंज़स्याने सुटण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व जबाबदार व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही पालवे या वेळी म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Blogger द्वारा समर्थित.