नितीन आगे खूनप्रकरणातील २ आरोपी ताब्यात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील बहूचर्चित नितीन आगे खुनप्रकरणातील दोन आरोपी उच्च न्यायालयाने आदेश देवूनही हजर राहत नसल्याने भिंगार कॅम्प पोलिसांनी मोठया शिताफीने त्यांना काल मंगळवारी (दि.१९) ताब्यात घेतले.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN


याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच स.पो. नि कैलास देशमाने यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की खर्डा येथील खुनप्रकरणातील आरोपी संदिप तुकाराम शिकारे (वय २७) व विनोद अभिमन्यू गटकळ (वय २७, दोघे रा. खर्डा, ता. जामखेड) हे नगर येथील चांदणी चौक येथे येणार असल्याचे समजले.

तेव्हा जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधिक्षक घनश्याम पाटील, सहा. पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पोसई करेवाड, पोकॉ. राजेंद्र सुद्रीक, पोकॉ. ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ. अडसूळ, पोकॉ. राहुल द्वारके, पोकॉ. सोनवणे यांना चांदणी चौक येथून दोघा आरोपींना ताब्यात घेवून भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन येथे आणले.

सदर आरोपींना सुरूवातीला जामीन देण्यात आला होता. मात्र पुन्हा त्यांचा जामिन अर्ज उच्च न्यायालयाने नाकारून त्यांना हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र ते हजर होत नसल्याने पोलिसांना कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. त्यांना पुढील कारवाईसाठी जामखेड पोलिस ठाण्याचे पोना. एन. एस. शेळके यांच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपींची रवानगी सबजेलमध्ये करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.