पाथर्डीत दोन गटातील हाणामारीत तरुणाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डीत अवैध प्रवासी वाहतुकीवरुन दोन गटात झालेल्या तुंबळ मारहाणीत मध्यस्थी करणाऱ्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सचिन पवार असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

बुधवारी अवैध प्रवासी वाहतुकीवरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी सचिन पवार त्या दोन गटात मध्यस्ती करण्यासाठी गेला होता. मात्र, त्यावेळी सचिनच्या डोक्यातही लाकडी दांडके आणि दगडने हल्ला करण्यात आला होता. यानंतर गंभीर जखमी झालेल्या सचिनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण शुक्रवारी पहाटे सचिनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर सचिनच्या मृत्यूनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त तौनात ठेवला होता. दुसरीकडे सचिनच्या नातेवाईकांनीही या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.