वाहतूक सुरळीत होण्यासाठी सचिन जगतापांसह ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी बुजवले खड्डे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगावातून जाणाऱ्या सोलापूर हायवेवर अरुंद पुलावर पडलेल्या मोठ्या-मोठ्या खड्यांमुळे अवजड वाहने तसेच प्रवासी वाहतूकीवर परिणाम होत आहे. काल शुक्रवारपासून या मार्गावरील वहातुक ठप्प होत आहे. आज सकाळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दहा किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या बांधकाम विभाग तरीही शांतच असल्याने माजी जि.प सदस्य सचिन जगताप, ग्रामपंचायत सदस्य व गावातील तरुण आणि आसपाच्या गावातील लोकांनी एकत्र येत त्या ओढ्यावर पडलेली खड्यांना मुरूम टाकून बुजविण्याचे काम सुरू केले.

घोगरगाव येथील नगर-सोलापूर रस्त्यावर दोन दिवसांपासून वाहतूक ठप्प होत आहे. तेथील ओढ्याच्या पुलावर खड्डे पडले आहेत. बांधकाम विभागाचे अधिकारी तरीही शांत असल्याने घोगरगाव व आसपासच्या गावातील तरुण श्रमदान करीत रस्त्यावर मुरूम टाकत आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी गावकरी झटत आहेत.

अरुंद पुलावरून एका वेळी एकाच बाजूने येणारे अवजड वाहने झुलत-झुलत जाताना अपघात होऊन मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ येत असल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली आहे .

                         

माजी जि.प सदस्य सचिन जगताप यांनी आज स्वतः JCB वर बसत मुरूमाचे सुमारे ८-१० ट्रॅक्टर टाकून पुलावरील खड्डे बुजवले. यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते. याप्रसंगी गावकऱ्यांनी त्यांचा नागरी सत्कार करत लवकरच अरुंद पुलासंबंधी ठोस उपाययोजना करण्याबाबत सचिन जगताप यांच्यासोबत चर्चा केली.गावकऱ्यांचे प्रश्न यामागेही मार्गी लावलेत आणि यापुढेही मी त्यासाठी तत्पर आहे. चर्चा आणि एकमेकांना साथ देत भविष्यात असेच काम करण्यासंबंधी सर्व कार्यकर्त्यांना सचिनभाऊ जगताप यांनी सूचना दिल्या.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.